SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 9
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्राकृत या शब्दाचा अर्थ काही विशिष्ट भाषांना प्राकृत हा शब्द लावला जातो. या प्राकृत शब्दाची व्युत्पत्ति व नेमका अर्थ काय ? याविषयी मात्र मतभेद आहे. (अ) काही लोकांच्या मते, प्राकृत हा शब्द 'प्रकृति' या संस्कृत शब्दावरून साधलेला तद्धित शब्द आहे. तथापि प्रकृति या शब्दाने कोणता अर्थ अभिप्रेत आहे ? याबद्दलही मतभिन्नता आढळते. भारतीय प्राकृत वैयाकरण१ व आलंकारिक यांच्या मते प्रकृति शब्दाने संस्कृत भाषा सूचित होते. संस्कृतरूप प्रकृतीपासून उद्भूत झालेली, निघालेली वा निर्माण झालेली १ (c) यापासून निघालेल्या मराठी, गुजराती, बंगाली, हिंदी इत्यादी आधुनिक भाषांचा हा कालखंड आहे. २ प्राकृत व्याकरण सांगणारे अनेक ग्रंथ आहेत. त्यातील काही अनुपलब्ध, काही अप्रकाशित तर काही प्रकाशित आहेत. उदा- १) लंकेश्वरकृत प्राकृतकामधेनु २ ) समन्तभद्रकृत प्राकृत व्याकरण ३) नरचंद्रकृत प्राकृतप्रबोध ४) वामनाचार्यकृत प्राकृतचंद्रिका ५) नरसिंहकृत प्राकृतप्रदीपिका ६ ) चिन्नवोम्मभूपालकृत प्राकृतमणिदीपिका ७) षड्भाषामंजरी ८) षड्भाषावार्तिक ९ ) षड्भाषाचंद्रिका (भामकविकृत) १०) षड्भाषासुबन्तादर्श ११ ) षड्भाषारूपमालिका ( दुर्गणाचार्यकृत) १२ ) षड्भाषासुबन्तरूपादर्श (नागोबाकृत) १३ ) शुभचंद्रकृत चिन्तामणि व्याकरण १४ ) औदार्यचिन्तामणि ( श्रुतसागरकृत) १५ ) प्राकृत व्याकरण (भोजकृत) १६) प्राकृत व्याकरण (पुष्पवननाथकृत) १७) अज्ञातकर्तृक प्राकृतपद्यव्याकरण १८) पुरुषोत्तमदेवकृत प्राकृतानुशासन. पुढील ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत :- १) चण्डकृत प्राकृतलक्षण २) वररुचिकृत प्राकृतप्रकाश. या ग्रंथावर प्राकृतसंजीवनी इत्यादी टीका आहेत. ३) हेमचंद्रकृत प्राकृत व्याकरण. यावर ढुंढिका टीका आहे. ४) क्रमदीश्वरकृत संक्षिप्तसार ५ ) त्रिविक्रमकृत प्राकृत व्याकरण ६) सिंहराजकृत प्राकृतरूपावतार ७) लक्ष्मीधरकृत षड्भाषाचंद्रिका ८) मार्कंडेयकृत प्राकृतसर्वस्व ९) रामशर्मतर्कवागीशकृत प्राकृतकल्पतरु १०) अप्पय्य दीक्षितकृत प्राकृतमणिदीप ११) रघुनाथकृत प्राकृतानंद १२) शेषकृष्णकृत प्राकृतचंद्रिका. प्रकृतिः संस्कृतं तत्र भवं तत आगतं वा प्राकृतम् (हेमचंद्र); प्रकृति: संस्कृतं तत्र भवं प्राकृतमुच्यते (मार्कंडेय); प्रकृतिः संस्कृतं तत्रभवत्वात् प्राकृतं स्मृतम् (प्राकृतचंद्रिका); प्रकृतेः संस्कृतादागतं प्राकृतम् (वाग्भट्टालंकारटीका); संस्कृतरूपायाः प्रकृतेरुत्पन्नत्वात् प्राकृतम् (काव्यादर्शावरील टीका) ; प्रकृतेरागतं प्राकृतम्। प्रकृति: संस्कृतम् (धनिक).
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy