________________
प्राकृत व्याकरणे
( सूत्र ) प्रवासी क्षौ ।। ९५।।
(वृत्ति) अनयोरादेरित उत्वं भवति । पावासुओ । उच्छू ।
(अनु.) प्रवासि (न्) व इक्षु या शब्दांत आदि इ चा उ होतो. उदा. पावासुओ।
उच्छू।
७५
( सूत्र ) युधिष्ठिरे वा ।। ९६।।
(वृत्ति) युधिष्ठिरशब्दे आदेरित उत्वं वा भवति । जहुट्ठिलो जहिट्ठिलो । (अनु.) युधिष्ठिर या शब्दात, आदि इ चा उ विकल्पाने होतो. उदा. जहुट्ठिलो, जहिलो.
( सूत्र ) ओच्च द्विधाकृग: ।। ९७।।
(वृत्ति) द्विधाशब्दे कृग्धातोः प्रयोगे इत ओत्वं चकारादुत्वं च भवति । दोहाकिज्जइ दुहाकिज्जइ । दोहाइअं दुहाइअं । कृग इति किम् । दिहागयं । क्वचित् केवलस्यापि । दुहारे वि सो सुरवहूसत्थो ।
(अनु.) द्विधा या शब्दाच्या पुढे कृ धातूचा उपयोग (प्रयोग) असता, द्विधा या शब्दात, इ चा ओ आणि (सूत्रात वापरलेल्या ) चकारामुळे (=च या शब्दामुळे) उ (सुद्धा) होतो. उदा. दोहा... दुहाइअं (द्विधा शब्दाच्या पुढे) कृ धातूचा (प्रयोग असताना) असे का म्हटले आहे ? ( कारण तसे नसल्यास, द्विधा मधील इ चा ओ किंवा उ होत नाही. उदा. ) दिहागयं. क्वचित् (पुढे कृ धातूचा वापर नसताना) केवळ (द्विधा शब्दातही इ चा उ होतो. उदा.) दुहा........सत्थो.
( सूत्र ) वा निर्झर ना ।। ९८ ।।
( वृत्ति) निर्झरशब्दे नकारेण सह इत ओकारो वा भवति । ओज्झरो निज्झरो । (अनु.) निर्झर या शब्दात, नकारासह इ चा ओकार विकल्पाने होतो. उदा. ओज्झरो,
निज्झरो.
१ क्रमाने :- द्विधाक्रियते, द्विधाकृत
३ द्विधा अपि सः सुर-वधू-सार्थः
२ द्विधागत