________________
प्राकृत व्याकरणे
७३
(सूत्र) शिथिलेगुदे वा ।। ८९।। (वृत्ति) अनयोरादेरितोऽद् वा भवति। सढिलं। पसढिलं । सिढिलं। पसिढिलं'।
अंगुअं इंगुअं। निर्मितशब्दे तु वा आत्वं न विधेयम्।
निर्मातनिर्मितशब्दाभ्यामेव सिद्धेः। (अनु.) शिथिल आणि इगुद या दोन शब्दांत आदि इ चा अ विकल्पाने होतो.
उदा. सढिलं.... इंगुअं. परंतु निर्मित या शब्दात मात्र (इ चा) विकल्पाने आ होतो असे विधान करावयाचे नाही; कारण (निम्माअ आणि निम्मिअ हे शब्द) निर्मात आणि निर्मित या शब्दांवरून सिद्ध होतात.
(सूत्र) तित्तिरौ रः ।। ९०॥ (वृत्ति) तित्तिरिशब्दे रस्येतोऽद् भवति । तित्तिरो । (अनु.) तित्तिरि या शब्दात र् शी संपृक्त असणाऱ्या इ चा अ होतो. उदा. तित्तिरो.
(सूत्र) इतौ तो वाक्यादौ ।। ९१।। (वृत्ति) वाक्यादिभूते इतिशब्दे यस्तस्तत्संबंधिन इकारस्य अकारो भवति।
इअरे जंपिआवसाणे। इअ विअसिअकुसुमसरो३। वाक्यादाविति किम्।
पिओ त्ति। पुरिसो५ त्ति। (अनु.) वाक्याच्या आदि असणाऱ्या इति या शब्दांत जो त् आहे त्याच्याशी
संबंधित असणाऱ्या इकाराचा अकार होतो. उदा. इअ...सरो. वाक्याच्या आदि असणाऱ्या (इति शब्दात) असे का म्हटले आहे ? (कारण जर इति वाक्यारंभी नसेल, तर त् शी संपृक्त इ चा अ न होता, सू.१.४२ प्रमाणे वर्णान्तर होते. उदा) पिओ.... त्ति.
(सूत्र) ईर्जिह्वा-सिंह-त्रिंशतिशतौ त्या ।। ९२।। (वृत्ति) जिह्वादिषु इकारस्य तिशब्देन सह ईर्भवति। जीहा। सीहो। तीसा।
१ प्रशिथिल ३ इति विकसितकुसुमश(स) रः।
२ इति जल्पितावसाने। ४ प्रियः इति।
५ पुरुष: इति।