________________
७०
प्रथमः पादः
(अनु.) द्वार या शब्दात, आ चा ए विकल्पाने होतो. उदा. देरं. (विकल्प)
पक्षी:- दुआरं... बारं. नेरइओ व नारइओ ही रूपे कशी होतात ? (उत्तर-) नैरयिक व नारकिक या शब्दांची (ही रूपे) होतील. आर्ष प्राकृतात इतर ठिकाणीही (आ चा ए होतो. उदा.) पच्छेकम्म... देवासुरी.
(सूत्र) पारापते रो वा ।। ८०।। (वृत्ति) पारापतशब्दे रस्थस्यात एद् वा भवति। पारेवओ पारावओ। (अनु.) पारापत या शब्दात, र् मधील आ चा ए विकल्पाने होतो. उदा. पारेवओ,
पारावओ.
(सूत्र) मात्रटि वा ।। ८१।। (वृत्ति) मात्रट्प्रत्यये आत एद् वा भवति। एत्तिअमेत्तं? एत्तिअमत्तं ।
बहुलाधिकारात् क्वचिन्मात्रशब्देऽपि। भोअण-मेत्तं। (अनु.) मात्रट (मात्र) या प्रत्ययात, आ चा ए विकल्पाने होतो. उदा. एत्तिअमेत्तं,
एत्तिअमत्तं. बहुलचा अधिकार असल्याने, क्वचित् मात्र या शब्दातही (आ चा ए होतो. उदा.) भोअण-मेत्तं.
(सूत्र) उदोद्वाट्टै ।। ८२॥ (वृत्ति) आर्द्रशब्दे आदेरात उद् ओच्च वा भवतः। उल्लं ओल्लं। पक्षे। अल्लं
अदं। बाह-सलिल-पवहेण उल्लेइ। (अनु.) आर्द्र या शब्दात, आदि आ चे उ आणि ओ विकल्पाने होतात. उदा. उल्लं,
ओल्लं; (विकल्प-) पक्षी:- अल्लं, अदं; बाह....उल्लेइ.
(सूत्र) ओदाल्यां पङ्क्तौ ।। ८३।। (वृत्ति) आलीशब्दे पङ्क्तिवाचिनि आत ओत्वं भवति। ओली। पङ्क्ताविति
किम्। आली सखी। १ इयन्मात्र
२ भोजनमात्र ३ बाष्प-सलिल-प्रवाहेण आर्द्रयति (आर्दीकरोति) ।