________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
५२७
येथे तरुहुं व सउणिहँ या ष.अ.व. मध्ये 'हुँ' आणि 'हे' आदेश आहेत. सो सुक्खु -- येथे सुक्ख शब्द पुल्लिंगात वापरला आहे (सू. ४.४४५). कण्णहिं -- सू. ४.३४७. प्रायो....हुँ -- प्राय:चा अधिकार असल्याने, क्वचित् सुप् प्रत्ययालाही हुं आदेश होतो. सुप् चे नेहमीचे आदेश सू.४.३४७ मध्ये आहेत. श्लोक २ :- स्वामीचा मोठा भार पाहून, ढवळा (बैल) खेद करतो (व स्वत:शी म्हणतो-) माझे दोन तुकडे करून (जुवाच्या) दोन बाजूंना (दिशांना) मला का बरे जोडले नाही ?
येथे दुहुँ या स.अ.व. मध्ये 'हुँ' आदेश आहे. विसूरइ -- विसूर हा खिद् धातू चा आदेश आहे (सू. ४.१३२). पिक्खेवि, करेवि -- सू.४.४४०. दुहुँ -- प्राकृतात द्विवचन नसल्याने, हे अनेकवचन वापरलेले आहे. दिसिहिं -- सू. ४.३४७. खण्डइँ - - सू. ४.३५३.
४.३४१
श्लोक १ :- कोणत्याही भेदभावाविना (अरण्यात) पर्वताची शिळा व वृक्षाची फळे मिळतात (श-घेतली जातात); तथापि घराचा त्याग करून अरण्य (-वास) माणसांना आवडत नाही.
येथे गिरिहे व तरुहे या पं.ए.व. मध्ये 'हे' आदेश आहे. नीसावन्नु -- सू. ४.३९७. मेल्लेप्पिणु -- सू.४.४४०. माणुसहं -- सू.४.३३९.
श्लोक २ :- वृक्षांपासून वल्कल हे परिधान म्हणून व फळे हे भोजन म्हणून मुनी सुद्धा मिळवितात; (वस्त्र व भोजन यांचे बरोबरच) सेवक हे स्वामीपासून आदर (ही गोष्ट) अधिक मिळवितात.
येथे तरुहुँ व सामिहुँ या पं.अ.व. मध्ये हुं आदेश आहे. एत्तिउ -- सू.२.१५७, ४.३३१. अग्गल -- (म) आगळा. सू.४.३५४ पहा.