SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 494
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्राकृत व्याकरणे-तृतीय पाद ४९३ वेगळे करणे. प्रथमा इत्यादींना 'विभक्ती' हा शब्द प्राय: लावला जातो. तसेच, धातूंना लावल्या जाणाऱ्या काळ व अर्थ यांच्या प्रत्ययांचे बाबतीतही 'विभक्ती' हा शब्द वापरला जातो (विभक्तिश्च। - सुप्तिङन्तौ विभक्तिसंज्ञौ स्तः। पा.अ.१.४.१०४ वर सिद्धान्तकौमुदी). द्विवचनस्य....भवति -- प्राकृतात द्विवचनच नसल्याने, त्याचे ऐवजी बहु (अनेक) वचन वापरले जाते. ३.१३१ प्राकृतात चतुर्थी विभक्ती नसल्याने, तिच्याऐवजी षष्ठी विभक्ती वापरली जाते. अपवादासाठी सू. ३.१३२-१३३ पहा. ३.१३२ तादर्थ्य....वचनस्य -- डे हा चतुर्थी एकवचनाचा प्रत्यय आहे. प्रायः तादर्थ्य दाखविण्यास चतुर्थी वापरली जाते. ३.१३४ द्वितीया, तृतीया, पंचमी व सप्तमी या विभक्तींचे ऐवजीही क्वचित् षष्ठी विभक्ती वापरली जाते. ३.१३५ तृतीया विभक्तीच्या ऐवजी सप्तमी विभक्तीचा उपयोग विमलसूरिकृत 'पउमचरिय ग्रंथामध्ये पुष्कळ आहे. ३.१३८ क्यङन्तस्य....लुग् भवति -- नामापासून धातू सिद्ध करण्यास, क्यङ् आणि क्यष् असे दोन प्रत्यय आहेत. त्या प्रत्ययाशी संबंधित असणाऱ्या 'य' चा लोप विकल्पाने होतो. लोहित इ. काही शब्दांना क्यङ्-ष् प्रत्यय लागतो. उदा. लोहित - लोहितायति-ते. सदृश आचार दाखविण्यास क्यङ् प्रत्यय जोडला जातो. उदा. (काक:) श्येनायते (श्येनाप्रमाणे वागतो). दमदमा -- एक प्रकारचे वाद्य. ३.१३९-३.१८० या सूत्रांत धातुरूपविचार आहे. या संदर्भात पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात :- प्राकृतमध्ये व्यंजनान्त धातु नाहीत; सर्व धातू स्वरान्त आहेत; बहुसंख्य धातु अकारान्त आहेत. धातूंचा गणभेद व
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy