________________
प्राकृत व्याकरणे-तृतीय पाद
४८७
३.६५ श्लोक १ :- जेव्हा सहृदयांकडून घेतले जातात, तेव्हा ते गुण होतात.
___पक्षे कहिं...कत्थ -- सू.३.५९-६० पहा.
३.६८ डिणो डीस -- डित् इणो व डित् ईस.
३.७० लक्ष्यानुसारेण -- व्याकरणीय नियमांच्या उदाहरणांना अनुसरून. ३.७१ कत्तो कदो -- सू. २.१६० पहा.
३.७४ स्सिं -- सू. ३.५९ पहा. स्स -- सू. ३.१० पहा.
३.७७ इमं....इमेहि -- इम या अंगापासून झालेली रूपे आहेत.
३.८२ एत्तो एत्ताहे -- त्तो व त्ताहे प्रत्यय लागताना, एत(द्) मधील त चा लोप
होतो (सू. ३.८३ पहा).
३.८३ एतदस्त्थे परे -- एतद् च्या पुढे त्थ असताना. त्थ साठी सू. ३.५९
पहा.
३.८७ अदसो....न भवति -- याचा मथितार्थ असा की सर्व लिंगांत अदस्
सर्वनामाचे प्र.ए.व. अह असे होते.
३.८८ अदस् चे अमु असे अंग होते व ते उकारान्त नामाप्रमाणे चालते.
३.८९ ङ्यादेशे म्मौ -- सू. ३.५९ नुसार ङि प्रत्ययाला म्मि हा आदेश होतो.
३.९०-३.९१ दिट्ठो, चिट्ठह -- हे शब्द मागील शब्दांची प्रथमा दाखवितात.
३.९२-३.९३ वन्दामि, पेच्छामि -- हे मागील शब्दांची द्वितीया दाखवितात.