________________
४३४
टीपा
विशिष्ट प्रयोजनासाठी शब्दाच्या मागे वा पुढे इत् वर्ण जोडले जातात. इत् म्हणजे जो येतो आणि आपले कार्य करून निघून जातो. म्हणून शब्दाच्या अन्तिम रूपात इत् वर्ण असत नाही. आता, ज्यातील ड् इत् आहे असा डित् प्रत्यय (वा आदेश) ज्या शब्दाच्या पुढे येतो, त्या शब्दाच्या भ' च्या 'टि' चा लोप होतो. 'भ' म्हणजे प्रत्यय लावण्यापूर्वीचे शब्दाचे अंग. 'टि' म्हणजे शब्दातील अन्त्य स्वरासह पुढील सर्व वर्ण. संक्षेपाने, डित् प्रत्यय वा आदेश लागताना, शब्दाच्या अंगातील अन्त्य स्वरासह पुढील सर्व वर्णांचा लोप होतो. उदा. सर्वतः + डो = सव्वओ. सिद्धावस्था -- सू.१.१ वरील टीप पहा. कुदो - असे वर्णान्तर शौरसेनीतही होते.
१.३८ यथासङ्ख्यम् - अनुक्रमे, अनुक्रमाने. अभेदनिर्देश: सर्वादेशार्थ :
'निष्प्रती ओत्परी' असा या सूत्रात अभेदाने केलेला निर्देश, आदेश संपूर्ण शब्दाला होतो, हे दाखविण्यासाठी आहे.
१.३९ हे अधिकारसूत्र आहे. 'प्रावरणे अङ्ग्वाऊ' (सू. १.७५) या सूत्राअखेर
त्याचा अधिकार आहे.
१.४० त्यदादि -- त्यत् इत्यादी सर्वनामांना ‘त्यदादि' ही संज्ञा आहे. यामध्ये
त्यद्, तद्, यद्, एतद् इत्यादी सर्वनामे येतात. अव्यय -- तीन लिंगे, सर्व विभक्ती आणि वचने यांत ज्याचे रूप विकार न पावता तसेच रहाते, ते
अव्यय. अम्हे -- अम्ह (अस्मद्) सर्वनामाचे प्रथमा अ.व. इमा -- इम (इदम्) सर्वनामाचे स्त्रीलिंगी प्रथमा ए.व. अहं -- अम्ह चे प्रथमा ए.व. एत्थ -- सू.२.१६१, १.५७ पहा.
१.४१ अपि -- या अव्ययाची पि, वि, अवि अशी वर्णान्तरे होतात.
१.४२ इति -- या अव्ययाची त्ति, ति, इअ अशी वर्णान्तरे होतात. इअ --
सू.१.९१ पहा.