________________
चतुर्थः पादः
(अनु.) शौरसेनी भाषेत, र्य च्या स्थानी य्य विकल्पाने होतो. उदा. अय्यउत्त... सुय्यो. ( विकल्प - ) पक्षी :- अज्जो... परवसो.
३३२
( सूत्र ) थो ध: ।। २६७।।
( वृत्ति) शौरसेन्यां थस्य धो वा भवति । कधेदि कहेदि । णाधो णाहो । कधं कहं। राजपधो राजपहो । अपदादावित्येव । थामं । थेओ । (अनु.) शौरसेनी भाषेत ( पदाच्या आदि नसणाऱ्या ) थ चा ध विकल्पाने होतो. उदा. कधेदि... राजपहो. पदाच्या आदि नसणाऱ्या (थ चाच ध होतो; पदाच्या प्रारंभी असणाऱ्या थ चा ध होत नाही. उदा.) थामं, थेओ.
( सूत्र ) इह - होर्हस्य ।। २६८।।
(वृत्ति) इहशब्दसंबंधिनो मध्यमस्येत्थाहचौ (३.१४३) इति विहितस्य हचश्च हकारस्य शौरसेन्यां धो वा भवति । इध । होध । परित्तायध' । पक्षे । इह । होह । परित्तायह ।
(अनु.) शौरसेनी भाषेत इह या शब्दाशी संबंधित असणारा (ह) तसेच 'मध्यम...हचौ' या सूत्रात सांगितलेल्या हच् मधील (ह) हकाराचा ध विकल्पाने होतो. उदा. इध...परित्तायध. ( विकल्प - ) पक्षी :
इह...परित्तायह.
( सूत्र ) भुवो भ: ।। २६९।।
(वृत्ति) भवतेर्हकारस्य शौरसेन्यां भो वा भवति । भोदि होदि । भुवदि हुवदि । भवदि हवदि ।
(अनु.) शौरसेनी भाषेत भवति (भू या धातू) च्या हकाराचा भ विकल्पाने होतो. उदा. भोदि...हवदि.
१ कथ्
७ इह
२ नाथ ३ कथम् ४ राजपथ ५ स्थाम ६ स्तोक ८ परि+त्रै