________________
प्राकृत व्याकरणे
३२३
(अनु.) कर्मणि आणि भावे (रूपात) असणाऱ्या चि (धातू) च्या अन्ती संयुक्त म
(म्हणजे म्म) विकल्पाने येतो आणि त्या (म्म) च्या सानिध्यामुळे क्य (प्रत्यया) चा लोप होतो. उदा. चिम्मइ...चिणिज्जइ. भविष्यकाळात (असेच होते. उदा) :- चिम्मिहिइ...चिणिहिइ.
(सूत्र) हन्-खनोऽन्त्यस्य ।। २४४।। (वृत्ति) अनयोः कर्मभावेऽन्त्यस्य द्विरुक्तो मो वा भवति तत्संनियोगे क्यस्य
च लुक् । हम्मइ हणिज्जइ। खम्मइ खणिज्जइ। भविष्यति। हम्मिहिइ हणिहिइ। खम्मिहिइ खणिहिइ। बहुलाधिकाराद्धन्ते: कर्तर्यपि। हम्मइ
हन्तीत्यर्थः। क्वचिन्न भवति। हन्तव्वं। हन्तूण। हओ। (अनु.) कर्मणि आणि भावे (रूपात) असणाऱ्या (हन् आणि खन्) यां (धातूं) च्या
अन्ती द्विरुक्त म (म्हणजे म्म) विकल्पाने येतो आणि त्या (म्म) च्या सांनिध्यामुळे क्य (प्रत्यया) चा लोप होतो. उदा. हम्मइ...खणिज्जइ. भविष्यकाळात (असेच होते. उदा) :- हम्मिहिइ...खणिहिइ. बहुलचा अधिकार असल्यामुळे, हन्ति (हन्) या धातूच्या कर्तरि रूपातही (असा म्म येतो). उदा. हम्मइ म्हणजे हन्ति (ठार करतो) असा अर्थ आहे. क्वचित् (असा म्म) होत नाही. उदा.हन्तव्वं...हओ.
(सूत्र) ब्भो दुह-लिह-वह-रुधामुच्चातः ।। २४५।। (वृत्ति) दुहादीनामन्त्यस्य कर्मभावे द्विरुक्तो भो वा भवति तत्संनियोगे क्यस्य
च लुग् वहेरकारस्य च उकारः। दुब्भइ दुहिज्जइ। लिब्भइ लिहिज्जइ। वुब्भइ वहिजइ। रुब्भइ रुन्धिजइ। भविष्यति। दुब्भिहिइ दुहिहिइ।
इत्यादि। (अनु.) कर्मणि आणि भावे रूपात दुह इत्यादि (म्हणजे दुह्, लिह, वह् आणि रुध्)
धातूंच्या अन्त्य वर्णाचा द्विरुक्त भ (म्हणजे ब्भ) विकल्पाने होतो, आणि त्या (ब्भ) च्या सांनिध्यामुळे क्य (प्रत्यया) चा लोप होतो आणि वह् (धातू) मधील अकाराचा उकार होतो. उदा. दुब्भइ...रुन्धिज्जइ. भविष्यकाळातही (असेच होते. उदा.) :- दुब्भिहिइ, दुहिहिइ इत्यादि.