________________
२८४
( सूत्र ) विस्मुः पम्हुस - विम्हर - वीसरा: ।। ७५ ।।
(वृत्ति) विस्मरतेरेते आदेशा भवन्ति । पम्हुस । विम्हरइ। वीसरइ। (अनु.) विस्मृ (विस्मरति ) ( या धातू) ला (पम्हुस, विम्हर आणि वीसर असे) हे आदेश होतात. उदा. पम्हुसइ... वीसरइ.
चतुर्थः पादः
( सूत्र ) व्याहृगे: कोक्क - पोक्कौ ।। ७६ ।।
(वृत्ति) व्याहरतेनेतावादेशौ वा भवतः । कोक्कइ । ह्रस्वत्वे तु कुक्कइ । पोक्कइ । पक्षे। वाहरइ।
(अनु.) व्याहृ ( व्याहरति ) ( या धातू) ला (कोक्क आणि पोक्क) असे आदेश विकल्पाने होतात. उदा. कोक्कइ; (कोक्कइ मधील ओ हा स्वर ) ह्रस्व झाला असता मात्र कुक्कइ ( असे रूप होईल ) ; पोक्कइ. (विकल्प - ) पक्षी
:- वाहरइ.
( सूत्र ) प्रसरे: पयल्लोवेल्लौ ।। ७७ ।।
(वृत्ति) प्रसरते: पयल्ल उवेल्ल इत्येतावादेशौ वा भवतः। पयल्लइ। उवेल्लइ । पसरइ ।
(अनु.) प्रसृ ( प्रसरति ) ( या धातू) ला पयल्ल आणि उवेल्ल असे हे आदेश विकल्पाने होतात. उदा. पयल्लइ, उवेल्लइ. (विकल्पपक्षी :-) पसरइ.
( सूत्र ) महमहो गन्धे ।। ७८ ।।
(वृत्ति) प्रसरतेर्गन्धविषये महमह इत्यादेशो वा भवति । महमहइ मालई' । मालई - गन्धो पसरइ । गन्ध इति किम् ? पसरइ ।
(अनु.) गंधविषयक प्रसरति (प्रसृ) (या धातू) ला महमह असा आदेश विकल्पाने होतो. उदा. महमहइ मालई. ( विकल्प - पक्षी :-) मालई ... पसरइ. गंधविषयक असे का म्हटले आहे ? ( कारण गंधविषयक प्रसृ हा धातु नसेल, तर महमह हा आदेश होत नाही. उदा.) पसरइ.
१ मालती
२ मालतीगन्धः प्रसरति ।