________________
(२७)
व्याकरणातील काही तांत्रिक शंकाचे निरसन प्रा.डॉ.प.ल. वैद्य यांनी अतिशय आपुलकीने केले. मी त्यांना धन्यवाद देतो.
प्रस्तुत ग्रंथ प्रकाशित होण्याच्या दृष्टीने प्रा.डॉ.सौ. अनघा जोशी यांनी केलेले साहाय्य मोलाचे आहे. पूज्य गणिवरश्री वैराग्यरतिविजयजी म.सा. यांनी या ग्रंथाची उपयोगिता पाहून प्रकाशित करण्याची प्रेरणा दिली. त्यांच्याच सहकार्यामुळे श्रुतभवन संशोधन केंद्र येथून हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. त्यांचे मन:पूर्वक आभार. प्रस्तुत ग्रंथ कॉम्प्युटरवर टाइप करण्याचे अत्यंत किचकट काम माझे मित्र श्री.भा.ग. वेदपाठक यांनी चांगल्याप्रकारे केले. त्यांना धन्यवाद.
प्रस्तुत पुस्तकात काही त्रुटी व मुद्रणदोष राहिले असण्याची शक्यता आहे. त्याकडे वाचकांनी क्षमादृष्टीने पहावे अशी विनंती आहे.
के.वा.आपटे