________________
प्राकृत व्याकरणे
२६७
होतात. आणि (या धात्वादेशांचे बाबतीत) संस्कृतातील धातूप्रमाणेच प्रत्यय, लोप, आगम इत्यादि विधि ( कार्ये) होतात.
( सूत्र ) दुःखे णिव्वरः ।। ३।।
(वृत्ति) दुःखविषयस्य कथेर्णिव्वर इत्यादेशो वा भवति । णिव्वरइ । दुःखं कथयतीत्यर्थः।
(अनु.) दुःखविषयक कथ् (धातू) ला णिव्वर असा आदेश विकल्पाने होतो. उदा. णिव्वरइ (म्हणजे) दु:खाने सांगतो असा अर्थ आहे.
(सूत्र) जुगुप्सूर्झण - दुगुच्छ - दुगुञ्छा: ।। ४॥
( वृत्ति) जुगुप्सेरेते त्रय आदेशा वा भवन्ति । झुणइ । दुगुच्छइ । दुगुञ्छइ । पक्षे । जुगुच्छइ । गलोपे । दुउच्छइ । दुउञ्छइ । जुउच्छइ ।
(अनु.) जुगुप्स् (धातू) ला हे (झुण, दुगुच्छ, आणि दुगुञ्छ ) तीन आदेश विकल्पाने होतात. उदा. झुणइ... दुगुञ्छइ. (विकल्प-) पक्षी:जुगुच्छइ. (या रूपात) ग् (या व्यंजना) चा लोप झाला असता दुउच्छइ, दुउञ्छइ, जुउच्छइ ( अशी रूपे होतात).
( सूत्र ) बुभुक्षि - वीज्योर्णीरव - वोज्जौ ।। ५।
(वृत्ति) बुभुक्षेराचारक्विबन्तस्य च वीजेर्यथासङ्ख्यमेतावादेशौ वा भवतः । णीरवइ । बुहुक्खइ। वोज्जइ । वीजइ ।
(अनु.) बुभुक्षू आणि आचार (अर्थी) क्विप् (प्रत्यया) ने अन्त पावणारा वीज् ( या धातूं) ना अनुक्रमे (णीरव आणि वोज्ज) हे आदेश विकल्पाने होतात. उदा. णीरवइ; ( विकल्प पक्षी :-) बुहुक्खइ. वोज्जइ (विकल्पपक्षी :-) वीजइ.