________________
प्राकृत व्याकरणे
२२९
(अनु.) (अदस् सर्वनामाच्या) अन्त्य व्यंजनाचा लोप झाल्यावर (आता) दकारान्त
(बनलेल्या) अदस् (या सर्वनामा) च्या स्थानी ङि (या प्रत्यया) चा आदेशरूप असा म्मि पुढे असताना, अय आणि इअ असे आदेश विकल्पाने होतात. उदा. अयम्मि, इयम्मि. (विकल्प-) पक्षी:- अमुम्मि.
(सूत्र) युष्मदस्तं तुं तुवं तुह तुमं सिना ।। ९०।। (वृत्ति) युष्मदः सिना सह तं तुं तुवं तुह तुम इत्येते पञ्चादेशा भवन्ति। तं तुं
तुवं तुह तुमं दिट्ठो। (अनु.) सि (या प्रत्यया) सह युष्मद् (या सर्वनामा) ला तं, तुं, तुवं, तुह, आणि
तुमं असे हे पाच आदेश होतात. उदा. तं तुं...दिट्ठो.
(सूत्र) भे तुब्भे तुज्झ तुम्ह तुम्हे उव्हे जसा ।। ९१।। (वृत्ति) युष्मदो जसा सह भे तुब्भे तुज्झ तुम्ह तुम्हे उय्हे इत्येते षडादेशा
भवन्ति। भे तुब्भे तुज्झ तुम्ह तुम्हे उव्हे चिट्ठह। ब्भो म्हज्झौ वा
(३.१०४) इति वचनात् तुम्हे। तुज्झे। एवं चाष्टरूप्यम्। (अनु.) जस् (या प्रत्यया) सह युष्मद् (या सर्वनामा) ला भे, तुब्भे, तुज्झ, तुम्ह,
तुम्हे आणि उय्हे असे हे सहा आदेश होतात. उदा. भे...चिट्ठह. 'ब्भो म्हज्झो वा' या वचनाने (तुब्भे या रूपातील ब्भ चा विकल्पाने म्ह आणि ज्झ होऊन) तुम्हे व तुज्झे (अशी रूपे होतात) आणि अशाप्रकारे (ही) रूपे (एकेंदर) आठ होतात.
(सूत्र) तं तुं तुम तुवं तुह तुमे तुए अमा ।। ९२।। (वृत्ति) युष्मदोमा सह एते सप्तादेशा भवन्ति। तं तुं तुमं तुवं तुह तुमे तुए
वन्दामि। (अनु.) अम् (या प्रत्यया) सकट युष्मद् (सर्वनामा) ला तं, तुं, तुमं, तुवं, तुह,
तुमे, तुए (असे) हे सात आदेश होतात. उदा. तं...वन्दामि.
२ वन्द्
A-Proof