________________
२२०
तृतीयः पादः
सुद्धा येतो. उदा. कास... तस्स. बहुलचा अधिकार असल्यामुळे किम् आणि तद् ही सर्वनामे आकारान्त ( स्त्रीलिंगात) असतानाही डास हा आदेश विकल्पाने येतो. उदा. कस्या... तास धणं. ( विकल्प - ) पक्षी :काए, ताए.
( सूत्र ) ईद्भ्य: स्सा से ।। ६४ ।।
( वृत्ति) किमादिभ्य ईदन्तेभ्यः परस्य ङस: स्थाने स्सा से इत्यादेशौ वा भवत:। टाङस्ङेरदादिदेद्वा तु ङसे: ( ३.२९) इत्यस्यापवादः । पक्षे । अदादयोऽपि । किस्सा कीसे कीअ कीआ कीइ कीए । जिस्सा जीसे जीअ जीआ जीइ जीए । तिस्सा तीसे तीअ तीआ तीइ तीए । (अनु.) ईकारान्त (स्त्रीलिंगी) किम् इत्यादि (म्हणजे किं, यद् व तद् या) सर्वनामापुढे ङस् या (प्रत्यया) च्या स्थानी स्सा आणि से असे आदेश विकल्पाने होतात. ‘टाङस्...ङसे:' या (सूत्रातील) नियमाचा प्रस्तुत नियम अपवाद आहे. (विकल्प-) पक्षी (त्या ३.२९ नुसार ) अ इत्यादि सुद्धा होतात. उदा. किस्सा...तीए.
( सूत्र ) ङेर्डा डाला इआ काले ।। ६५।।
(वृत्ति) किंयत्तद्भ्य: कालेऽभिधेये ङे: स्थाने आहे आला इति डितौ इआ इति च आदेशा वा भवन्ति । हिंस्सिंम्मित्थानामपवादः । पक्षे तेऽपि भवन्ति। काहे काला कइआ । जाहे जाला जइआ। ताहे ताला तइआ । ताला' जाअन्ति गुणा जाला ते सहिअएहिँ घेप्पन्ति ।।१।। पक्षे । कहिं कस्सिं कम्मि कत्थ ।
(अनु.) काळ सांगावयाचा असताना किम्, यद् आणि तद् या (सर्वनामा) पुढील ङि या (प्रत्यया) च्या स्थानी 'आहे' आणि 'आला' असे (दोन) डित् आणि इआ असे आदेश विकल्पाने होतात. (ङि या प्रत्ययाला) हिं, स्सिं, म्मि आणि त्थ असे आदेश होतात या नियमाचा (सू. ३.५९-६०
१ तदा जायन्ते गुणाः यदा ते सहृदयैः गृह्यन्ते।