________________
A-Proof
प्राकृत व्याकरणे
२१५
( सूत्र ) ईद् भिस् - भ्यसाम् - सुपि ।। ५४ ।। (वृत्ति) राजन्शब्दसंबंधिनो जकारस्य भिसादिषु परतो वा ईकारो भवति । भिस्। राईहि। भ्यस्। राईहि राईहिन्तो राईसुन्तो । आम्। राईणं । सुप् । राईसु। पक्षे। रायाणेहि । इत्यादि ।
(अनु.) भिस् इत्यादि (म्हणजे भिस्, भ्यस्, आम् आणि सुप् हे) प्रत्यय पुढे असताना राजन् या शब्दाशी संबंधित असणाऱ्या जकाराचा ईकार विकल्पाने होतो. उदा. भिस् (पुढे असता ) :- राईहि. भ्यस् (पुढे असता) :राईहि...राईसुंतो. आम् (पुढे असता) :- राईणं. सुप् (पुढे असता) राईसु. ( विकल्प - ) पक्षी रायाणेहि इत्यादि.
· -
:
(सूत्र) आजस्य टाङसिङस्सु सणाणोष्वण् ।। ५५ ।। (वृत्ति) राजन् - शब्दसंबंधिन आज इत्यवयवस्य टाङसिङस्सु णा णो इत्यादेशापन्नेषु परेषु अण् वा भवति । रण्णा राइणा कयं । रण्णो राइणो आगओ धणं वा । टाङसिङस्स्विति किम् ? रायाणो चिट्ठन्ति पेच्छ वा। सणाणोष्विति किम् ? राएण । रायाओ। रायस्स । (अनु.) णा आणि णो असे आदेश ज्यांना प्राप्त झाले आहेत असे टा, ङसि आणि ङस् हे प्रत्यय पुढे असताना राजन् या शब्दाशी संबंधित असणाऱ्या 'आज' या अवयवाचा अण् विकल्पाने होतो. उदा. रण्णा...धणं वा. टा, ङसि आणि ङस् हे प्रत्यय पुढे असता असे का म्हटले आहे ? (कारण हे प्रत्यय पुढे नसल्यास अण् होत नाही. उदा.) रायाणो...पेच्छ वा. णा आणि णो असे आदेश ज्यांना प्राप्त झाले आहेत असे का म्हटले आहे ? ( कारण हे आदेश झालेले नसल्यास, अण् होत नाही. उदा.) राएण...रायस्स.
( सूत्र ) पुंस्यन आणो राजवच्च ।। ५६ ।।
(वृत्ति) पुंलिङ्गे वर्तमानस्यान्नन्तस्य स्थाने आण इत्यादेशो वा भवति । पक्षे । यथादर्शनं राजवत् कार्यं भवति । आणादेशे च अत: सेर्डो: ( ३.२) इत्यादय: प्रवर्तन्ते। पक्षे तु राज्ञ: जस् - शस् - ङसि - ङसां णो ( ३.५० )