________________
प्राकृत व्याकरणे
१९३
( सूत्र ) अमोऽस्य ।। ५॥
(वृत्ति) अतः परस्यामोऽकारस्य लुग् भवति । वच्छं पेच्छ। (अनु.) (शब्दांच्या अन्त्य) अकारापुढील अम् (प्रत्यया) मधील अकाराचा लोप होतो. उदा. वच्छं पेच्छ.
( सूत्र ) टा- आमोर्ण: ।। ६ ।।
( वृत्ति) अत: परस्य टा इत्येतस्य षष्ठीबहुवचनस्य च आमो णो भवति । वच्छेण। वच्छाण ।
(अनु.) (शब्दांच्या अन्त्य) अकारापुढील टा या ( प्रत्यया) चा तसेच षष्ठी बहुवचनाच्या आम् (प्रत्यया) चा ण होतो. उदा. वच्छेण; वच्छाण.
( सूत्र ) भिसो हि हिँ हिं ।। ७।।
(वृत्ति) अत: परस्य भिस: स्थाने केवलः सानुनासिक: सानुस्वारश्च हिर्भवति। वच्छेहि। वच्छेहिँ। वच्छेहिं कया छाही।
(अनु.) ( शब्दाच्या अन्त्य) अकारापुढील भिस् ( प्रत्यया) च्या स्थानी केवळ सानुनासिक आणि अनुस्वारयुक्त हि येतो. उदा. वच्छेहि...
ह... छाही.
( सूत्र ) ङसेस् तो - दो -दु-हि- हिन्तो-लुकः ।। ८।। (वृत्ति) अत: परस्य ङसे: त्तो दो दु हि हिन्तो लुक् इत्येते षडादेशा भवन्ति। वच्छत्तो। वच्छाओ। वच्छाउ । वच्छाहि । वच्छाहिन्तो । वच्छा। दकारकरणं भाषान्तरार्थम् ।
हि,
(अनु.) ( शब्दाच्या अन्त्य) अकारापुढील ङसि ( प्रत्यया) चे त्तो, दो, दु, हिंतो आणि लोप असे हे सहा आदेश होतात. उदा. वच्छत्तो... .वच्छा. (सूत्रातील दो व दु यामधील) दकाराचा वापर हा दुसऱ्या (म्हणजे शौरसेनी) भाषेसाठी आहे.
१ वृक्षैः कृता छाया ।