________________
१९०
अव्यय) वापरावे. उदा. एक्कसरिअं (म्हणजे) एकदम अथवा सांप्रत (आता) (असा अर्थ आहे).
द्वितीयः पादः
( सूत्र ) मोरउल्ला मुधा ।। २१४।।
(वृत्ति) मोरउल्ला इति मुधार्थे प्रयोक्तव्यम् । मोरउल्ला । मुधेत्यर्थः ।
(अनु.) मोरउल्ला असे (हे अव्यय) मुधा (शब्दा) च्या अर्थी वापरावे. उदा. मोरउल्ला (म्हणजे ) मुधा असा अर्थ आहे.
( सूत्र ) दरार्धाल्पे ।। २१५।।
(वृत्ति) दर इत्यव्ययमर्धार्थे ईषदर्थे च प्रयोक्तव्यम् । दर - विअसिअं । अर्धेनेषद्वा विकसितमित्यर्थः।
(अनु.) दर असे अव्यय अर्ध या अर्थी आणि ईषद् (अल्प, थोडसे) या अर्थी वापरावे. उदा. दरविअसिअं (म्हणजे ) अर्धे किंवा अल्प विकसित झालेले, असा अर्थ आहे.
( सूत्र ) किणो प्रश्ने ।। २१६।।
( वृत्ति) किणो इति प्रश्ने प्रयोक्तव्यम् । किणो धुवसिः ।
(अनु.) प्रश्न विचारताना किणो असे (अव्यय) वापरावे. उदा. किणो धुवसि.
( सूत्र ) इजेरा: पादपूरणे ।। २१७।।
(वृत्ति) इ जे र इत्येते पादपूरणे प्रयोक्तव्याः । न उणा इ अच्छीइं । अणुकूलं ३ वोत्तुं जे। गेण्हइ४ र कलमगोवी । अहो। हंहो। हेहो। हा। नाम। अहह। हीसि। अयि। अहाह। अरि रि हो इत्यादयस्तु संस्कृतसमत्वेन सिद्धाः।
(अनु.) इ, जे आणि र असे (हे शब्द) (पद्यांमध्ये) पादपूरणासाठी वापरावेत. उदा.
१ ( किणो) धुनोषि ।
३ अनुकूलं वक्तुं (जे)।
२ न पुन: (इ) अक्षिणी ।
४ गृह्णाति (र) कलम- गोपी ।