________________
A-Proof
प्राकृत व्याकरणे
१७७
संस्कृतमध्येही आहे असे इतर लोक म्हणतात. विष्णुः भट्टिओ...साहुली, इत्यादि. (या सूत्रातही सू.२.१६५ मधील) वा (=विकल्प) या शब्दाचा अधिकार असल्यामुळे, विकल्पपक्षी ( वर दिलेल्या शब्दांची रूपे) (वाङ्मयात) जसे आढळेल त्याप्रमाणे गउओ इत्यादिसुद्धा होतात. गोला आणि गोआवरी ही रूपे मात्र गोदा आणि गोदावरी या शब्दांपासून सिद्ध होतात. आणि (त्या त्या देशातील) भाषांमधील (विशिष्ट असे ) आहित्य (आहित्थ)...हल्लुप्फल्ल, इत्यादि शब्द महाराष्ट्र, विदर्भ इत्यादि देशात प्रसिद्ध आहेत आणि ते लोकांचे कडूनच जाणून घ्यावयाचे आहेत. (अशाच प्रकारे) क्रियावाचक शब्द (म्हणजे क्रियापदेही ) ( आढळतात. उदा. ) अवयासइ...उप्फालेइ इत्यादी आणि म्हणूनच कृष्ट... प्रोत, इत्यादि शब्द, तसेच क्विप्, इत्यादि प्रत्ययांनी अन्त पावणारे अग्निचित्...सुम्ल, इत्यादि शब्द - जे पूर्व कवींनी वापरलेले नाहीत, (त्यांच्या बाबतीत) अर्थ कळण्यास अडचण येईल अशा प्रकारचा प्रयोग ( वापर) करू नये; तर त्यांचा अर्थ (त्यांच्या) इतर समानार्थक शब्दांनी सांगावा. उदा. कृष्ट (बद्दल) कुशल, वाचस्पति (बद्दल) गुरु, विष्टरश्रवाः (बद्दल) हरि इत्यादि. तथापि मागे उपसर्ग असणाऱ्या घृष्ट शब्दाच्या प्रयोगाला अनुज्ञा आहेच. उदा. मन्दरयड...ट्ठाणंग इत्यादि. आर्ष प्राकृतात मात्र (वाङ्मयात) जसे आढळेल तसे सर्वच प्रयोग बरोबर ( अविरुद्ध) आहेत. उदा. घट्ठा... अ पुणो इत्यादि.
( सूत्र ) अव्ययम् ।। १७५।।
(वृत्ति) अधिकारोऽयम् । इतः परं ये वक्ष्यन्ते आपादसमाप्तेस्तेऽव्ययसंज्ञा
ज्ञातव्याः।
(अनु.) (सूत्रातील अव्यय शब्द) हा अधिकार आहे. हा (प्रस्तुत) पाद संपेपर्यंत यापुढे जे (शब्द) सांगितले जातील त्यांना अव्यय ही संज्ञा आहे असे जाणावे.
( सूत्र ) तं वाक्योपन्यासे ।। १७६ ।।