________________
A-Proof
प्राकृत व्याकरणे
१३१
:
अनिश्चल इति किम्। निच्चलो । आर्षे तथ्ये चोऽपि । तच्छं । (अनु.) हस्व स्वरापुढे असणाऱ्या थ्य, श्च, त्स आणि प्स यांचा छ होतो; पण निश्चल शब्दात मात्र (श्च चा छ ) होत नाही. उदा. थ्य ( चा छ) :पच्छं...मिच्छा. श्च ( चा छ ) :- पच्छिमं...पच्छा. त्स ( चा छ ) उच्छाहो...चिइच्छइ. प्स ( चा छ ) :- लिच्छइ... अच्छरा. ह्रस्व स्वरापुढे असणाऱ्या असे का म्हटले आहे ? (कारण मागे ह्रस्व स्वर नसल्यास, होत नाही. उदा.) ऊसारिओ. निश्चल शब्दात होत नाही असे का म्हटले आहे ? (कारण निश्चल शब्दात श्च चा च होतो. उदा ) - निच्चलो. आर्ष प्राकृतात तथ्य शब्दातील (थ्य चा) च सुद्धा होतो.
छ
उदा. तच्चं.
( सूत्र ) सामर्थ्यात्सुकोत्सवे वा ।। २२ ।।
(वृत्ति) एषु संयुक्तस्य छो वा भवति । सामच्छं सामत्थं । उच्छुओ ऊसुओ। उच्छवो ऊसवो।
(अनु.) सामर्थ्य, उत्सुक आणि उत्सव या शब्दांत संयुक्त व्यंजनाचा छ विकल्पाने होतो. उदा. सामच्छं... ऊसवो.
( सूत्र ) स्पृहायाम् ।। २३।।
(वृत्ति) स्पृहाशब्दे संयुक्तस्य छो भवति । फस्यापवादः । छिहा। बहुलाधिकारात् क्वचिदन्यदपि । निप्पिहो ।
(अनु.) स्पृहा या शब्दात संयुक्त व्यंजनाचा छ होतो. ( स्प चा) फ होतो या नियमाचा (२.५३) प्रस्तुत नियम अपवाद आहे. उदा. छिहा. बहुलचा अधिकार असल्यामुळे क्वचित् (स्पृहा शब्दात छ न होता ) वेगळेही (वर्णान्तर) होते. उदा. निप्पिहो.
( सूत्र ) द्य-य्य - र्यां जः ।। २४।।
(वृत्ति) एषां संयुक्तानां जो भवति । द्य। मज्जं । अवज्जं । वेज्जो । जुई। जोओ।
१ नि:स्पृह २ मद्य, अवद्य, वैद्य, द्युति, द्योत.