________________
१२६
द्वितीयः पादः
:
दुक्कर' । निक्कंपं । निक्कओ । नमोक्कारो । सक्कयं । सक्कारो। तक्करो (अनु.) ष्क आणि स्क हे नामांत म्हणजे नामवाचक शब्दांत असताना त्यांचा ख होतो. उदा. ष्क (चाख) :- पोक्खरं...निक्खं. स्क ( चा ख ) खंधो... अवक्खंदो. नामामध्ये (ष्क आणि स्क) असताना असे का म्हटले आहे ? (कारण ते इतर शब्दांत असतील तर त्यांचा ख होत नाही. उदा.) दुक्करं... तक्करो.
( सूत्र ) शुष्क - स्कन्दे वा ।। ५ ।।
( वृत्ति) अनयोः ष्कस्कयोः खो वा भवति । सुक्खं सुक्कं । खंदो कंदो । (अनु.) शुष्क आणि स्कन्द या दोन शब्दात ष्क आणि स्क यांचा विकल्पाने ख होतो. उदा. सुक्खं...कन्दो.
( सूत्र ) क्ष्वेकादौ ।। ६॥
( वृत्ति) क्ष्वेटकादिषु संयुक्तस्य खो भवति । खेडओ । क्ष्वेटकशब्दो विषपर्यायः । क्ष्वोटक: खोडओ। स्फोटकः खोडओ। स्फेटकः खेडओ । स्फेटिक: खेडिओ।
(अनु.) क्ष्वेटक इत्यादि शब्दांत संयुक्त व्यंजनाचा ख होतो. उदा. खेडओ; (हा ) वेटके शब्द विष या शब्दाचा पर्याय शब्द आहे; क्ष्वोटक:... खेडिओ.
( सूत्र ) स्थाणावहरे ।। ७ ।।
(वृत्ति) स्थाणौ संयुक्तस्य खो भवति हरश्चेद् वाच्यो न भवति। खाणू। अहर इति किम् ? थाणुणो रेहा ।
(अनु.) स्थाणु या शब्दात संयुक्त व्यंजनाचा ख होतो; (पण) जर ( स्थाणु या शब्दाने) शंकर हा अर्थ सांगावयाचा असेल तर (स्थ चा ख) होत नाही.
१ दुष्कर, निष्कम्प, निष्क्रय, नमस्कार, संस्कृत, संस्कार, तस्कर. ( डॉ. वैद्यांनी शब्दसूचीत दिलेला सत्कार हा संस्कृत प्रतिशब्द योग्य नसून तो संस्कार असा प्रतिशब्द हवा. कारण येथे स्क असे संयुक्त व्यंजन हवे आहे).
२ स्थाणोः रेखा ।