________________
प्राकृत व्याकरणे
११७
अवयवोः । विणओ। बहुलाधिकारात् सोपसर्गस्यानादेरपि । संजमो । संजोगो । अवजसो। क्वचिन्न भवति । पओओ। आर्षे लोपोऽपि। यथाख्यातम् अहक्खायं । यथाजातम् अहाजायं। (अनु.) पदाच्या आदि असणाऱ्या य चा ज होतो. उदा. जसो.... जाइ. ( पदाच्या) आदि असणाऱ्या (य चा ज होतो) असे का म्हटले आहे ? ( कारण जर पदाच्या आदि य नसेल तर त्याचा ज होत नाही. उदा.) अवयवो, विणओ. बहुलचा अधिकार असल्यामुळे उपसर्गयुक्त आणि अनादि असणाऱ्या (यचा) सुद्धा (ज होतो. उदा.) संजमो....अवजसो. क्वचित् (उपसर्गयुक्त, अनादि असणाऱ्या य चा ज ) होत नाही. उदा. पओओ. आर्ष प्राकृतात (आदि य चा) लोप सुद्धा होतो. उदा. यथाढ्यातम्... .अहाजायं.
( सूत्र ) युष्मद्यर्थपरे त: ।। २४६।।
(वृत्ति) युष्मच्छब्देऽर्थपरे यस्य तो भवति । तुम्हारिसो" । तुम्हकेरो। अर्थपर इति किम् ? जुम्हदम्ह - पयरणं५ ।
(अनु.) (द्वितीय पुरुषी तू - तुम्ही असा) अर्थ असणाऱ्या युष्मद् या शब्दात य चा त होतो. उदा. तुम्ह... केरो. (द्वितीय पुरुषी ) अर्थ असणाऱ्यास (युष्मद् शब्दात) असे का म्हटले आहे ? ( कारण तसा अर्थ नसल्यास युष्मद् शब्दातील य चा त होत नाही. उदा.) जुम्ह.....पयरणं
( सूत्र ) यष्ट्यां ल: ।। २४७।।
(वृत्ति) यष्ट्यां यस्य लो भवति । लट्ठी । वेणु-लट्ठी । उच्छु- लट्ठी । महु
लट्ठी।
(अनु.) यष्टि या शब्दात य चा ल होतो. उदा. लट्ठी..... लट्ठी.
१ अवयव, विनय ३ प्रयोग
५ युष्मदस्मत्प्रकरणम् ।
२ संयम, संयोग, अपयशस्
४ युष्मादृश, युष्मदीय (सू. २.१४७ पहा)
६ वेणुयष्टि, इक्षुयष्टि, मधुयष्टि