________________
प्राकृत व्याकरणे
सहलं। सेभालिआ सेहालिआ । सभरी सहरी । गुभइ गुहइ । स्वरादित्येव । गुंफइ । असंयुक्तस्येत्येव । पुष्पं । अनादेरित्येव । चिट्ठड़ फणी । प्राय इत्येव । कसण - फणी ४ ।
११५
(अनु.) स्वरापुढे असणाऱ्या, असंयुक्त, अनादि अशा फ चे भ आणि ह होतात. (फ चा) क्वचित् भ होतो. उदा. रेफ... सिभा. पण क्वचित् (फ चा) ह होतो. उदा. मुत्ताहलं. क्वचित् (फ चे भ आणि ह असे) दोन्हीही होतात. उदा. सभलं...गुहइ. स्वरापुढे (फ असतानाच हे विकार होतात; मागे अनुस्वार असल्यास, हे विकार होत नाहीत. उदा.) गुंफइ. असंयुक्त असतानाच (फ चे हे विकार होतात; फ संयुक्त असल्यास होत नाहीत. उदा.) पुप्फं. अनादि असतानाच (फ चे हे विकार होतात; आदि असल्यास होत नाहीत. उदा.) चिट्ठइ फणी. प्राय: च (फ चे हे विकार होतात ; त्यामुळे कधी ते होतही नाहीत. उदा.) कसणफणी.
( सूत्र ) बो व: ।। २३७।।
(वृत्ति) स्वरात्परस्यासंयुक्तस्यानादेर्बस्य वो भवति । अलाबू। अलावू अलाऊ। शबल: सवलो।
(अनु.) स्वरापुढे असणाऱ्या, असंयुक्त, अनादि अशा ब चा व होतो. उदा. अलाबू... ....सवलो.
( सूत्र ) बिसिन्यां भ: ।। २३८।।
(वृत्ति) बिसिन्या बस्य भो भवति । भिसिणी । स्त्रीलिङ्गनिर्देशादिह न भवति । बिसतन्तु-पेलवाणं'।
(अनु.) बिसिनी या शब्दात ब चा भ होतो. उदा. भिसिणी. (सूत्रात बिसिनी असा) स्त्रीलिंगाचा (स्त्रीलिंगी शब्दाचा ) निर्देश असल्याने येथे (म्हणजे पुढील उदाहरणात ब चा भ) होत नाही. उदा. बिस.... पेलवाणं.
३ तिष्ठति फणी ।
१ गुम्फति । ४ कृष्णफणी
२ पुष्प
५ बिसतन्तुपेलवानाम्।