________________
प्रकरण ५ : असंयुक्त-व्यंजन-विकार
६७
आयुस् = आउ , आयुध = आउह ; मयूर=मऊर, के यूर = के ऊर (अलंकारविशेष); नियोग=निओय (आज्ञा,अधिकार), वियोग=विओग,
प्रयोजन पओयण. (अ) मध्य असंयुक्त य् चा कित्येकदा ज्ज् होतो.
अङ्गुलीयक अंगुलिज्जय (अंगठी), कञ्चुकीय कंचुइज्ज (अंत:पुराचा प्रतीहार), कौशेय=कोसेज (रेशमी वस्त्र), ग्रैवेय=गेवेज (देवविशेष, गळ्याचा दागिना), नामधेय=नामधेज्ज (नाव), उत्तरीय उत्तरिज. व् : लावण्य=लायण्ण, दिवस=दियह, जीव-जीय, जिय; विवर=वियर; प्रवृत्त पयत्त ; निवृत्त नियत्त ; दिवा=दिया (दिवसा), परिवार परियाल;
कवि कइ, सुकवि=सुकइ; प्रवृत्ति पउत्ति. (अ) मध्य असंयुक्त व् पुष्कळदा तसाच रहातो.
भावणा (भावना), देव, विवर, भवण (भवन), भुवण (भुवन), उववास (उपवास), विभव, विभाव; अहवा (अथवा), विवाह, निवास, आवास; विविह (विविध); देवी; विवेग (विवेक), पवेसमाणी.
६१ मध्य असंयुक्त ख् घ् थ् ध् फ् भ्
मध्य असंयुक्त ख् घ् थ् ध् फ् भ् यांच्या स्थानी ह येतो.१ (१) ख्=ह् : मुख=मुह, लेख लेह, शिखर=सिहर, नख=नह, सुख सुह,
मेखला मेहला (कमरपट्टा), प्रमुख पमुह, मयूख मोह (किरण), मुखर=मुहर; शिखा=सिहा, शाखा साहा; शिखिन्=सिहि (मोर, अग्नि);
सखी सही. (२) घ्=हर : मेघ मेह, ओघ ओह, राघव राहव, अमोघ अमोह,
१
खघथधभाम् । हेम. १.१८७ व फो भहौ। हेम. १.२३६ तसे पाहिले तर ही हकार युक्त व्यंजने आहेत. तेव्हा मागील व्यंजनाचा लोप होऊन ह् राहतो. असे म्हणण्यास हरकत नाही (भांडार. पृ. ३३६ पहा) म. :- प्राघुण-पाहुणा, लघु- (लहु)- हलु-हळू.
२