________________
प्रकरण ५ : असंयुक्त-व्यंजन - विकार
(इ) 'प्रति'' मधील त् चा कित्येकदा ड्' होतो: (प्रत्यादौ डः । हेम. १.२०६) प्रतिमा पडिमा, प्रतिपन्न=पडिवन्न ( स्वीकृत), प्रतिपक्ष = पडिवक्ख, प्रतिवचन=पडिवयण (उत्तर), प्रतिबुद्ध = पडिबुद्ध, प्रतिहार=पडिहार (द्वारपाल), प्रतिबद्ध= पडिबद्ध (बांधलेला)
(ई) ह्रस्व ऋ असलेल्या कित्येक संस्कृत क. भू. धा. विशेषणातील त् चा ड् होतो.
=
२
३
४
५
कृत=कड, मृत=मड, प्रावृत = पाउड (आच्छादित), हृत=हड, परिवृत=परिवुड (वेष्टित), दुष्कृत=दुक्कड, यथाकृत=अहागड (नेहमीच्या क्रमाने केलेले अन्न इ.), क्रीतकृत=कीयगड (एक प्रकारचा भिक्षा दोष), आहृत=आहड, विकृत=विगड, वियड; व्यापृत=वावड.
(उ) इतर काही शब्दातही मध्य असंयुक्त त् चा ड्४ होतो.
पतति=पडइ (पडतो), पतित =पडिय, पताका=पडाया, निकृति= नियडि, संस्कृति=संखडि (ओदनपाक), प्रकृति=पयडि, पतन=पडण, , वेतस=वेडिस, अवतंसक=वडिंसग ( तुरा).
(६) द्५ : पाद=पाय, वेद=वेय, खेद=खेय, मोद=मोय; सदा=सया, यदा=जया, तदा=तया, कदा=कया; यदि = जइ (जर), आदि = आइ; नदी = नई, कौमुदी=कोमुई, मदीय = मईय ( माझा ) ; मृदु = मिउ, पादुका=पाउया; उपदेश=उवएस, आदेश = आएस, विदेश=विएस.
(अ) अर्धमागधीत मध्य असंयुक्त द् पुष्कळदा तसाच राहतो.
उदधि=उदहि; उदर, भेद, उदार; उदक = उदग, आदान=आदाण, विदित=विदिय.
६५
'प्रति' मधील त् चा कधी कधी लोपही होतो । प्रति=पइ, प्रतिष्ठा = पइट्ठा, सम्प्रति=संपइ, प्रतिज्ञा = पइन्ना, प्रतिष्ठान = पइट्ठाण, प्रतिष्ठित = पइट्ठिय, प्रतिदिनं=पइदिणं.
म. :
प्रतिछाया-पडछाया, प्रतिशब्द- पडसाद, प्रतिपद्- पाडवा.
म. :
मृत - मडे.
म. :
पत्-पडणे, बिभीतक-बेहडा
म. :- पाद-पाय, मृदु-मउ, प्रसाद - पसाय.