________________
परिशिष्ट ? इतर काही प्राकृतांची काही वैशिष्ट्ये
888888888888888888888888888888888888888888888888888888
शौरसेनी :(अ) वर्ण :- (१) मध्य असंयुक्त त्, थ् चा अनुक्रमे द्, ध् होतो. उदा- रजतरजद, नाथ-नाध, (२) र्य चा विकल्पाने य्य होतो. उदा - आर्य-अय्य, अज्ज. (आ) रूपविचार :- (१) अकारान्त शब्दांना पंचमी ए व.त दो, दु हे प्रत्यय लागतात. उदा. :- जिणादो, जिणादु (२) वर्तमानकाली तृ. पु. ए. व. चे दि, दे हे प्रत्यय :- हसदि, हसदे (३) भविष्यकाळाचे चिह्न 'स्सि' आहे. उदा. - हसिस्सिदि. (४) इअ, त्ता, दूण हे ल्यबन्ताचे प्रत्यय आहे: पढिअ, पढित्ता, पढिदूण कृ व गम् ची ल्यबन्ते कडुअ, गडुअ अशीही होतात. (इ) संधी :- अन्त्य मकारापुढे इ वा ए आला असता मध्ये विकल्पाने ण येतो. उदा- युक्तम् इदम्- जुत्तं णिमं, जुत्त मिमं। (ई) अव्यये :- (१) इह-इध, इदानीम्-दाणिं, एव-य्येव असे विकार होतात. (२) हंजे - चेटीला हाक मारण्यास; अम्महे - आनंद दर्शविण्यास; ही ही विदूषकाचा आनंद दर्शविण्यास. मागधी :(अ) वर्ण :- (१) र बद्दल ल्, आणि ष्, स् बद्दल श् होतो. उदा कर-कल, पुरुष-पुलिश, सारस-सालश. (२) ष्ट, ष्ठ, ट्ट यांचा स्ट होतो. उदा - कष्टकस्ट, सुष्ठु-शुस्टु, पट्ट-पस्ट. (३) स्त व र्थ यांचा स्त होतो. उदा. सार्थ-शस्त, उपस्थित-उवस्तिद (४) च्छ बद्दल श्च येतो. उदा-गच्छ-गश्च (५) ज चा य होतो. उदा- जानाति-याणदि. (६) र्ज, द्य यांचा य्य होतो. उदा. दुर्जन-दुय्यण, मद्य-मय्य. (७) न्य, ण्य, ज्ञ,ञ्ज यांचा ञ होतो. उदा. अन्य-अञ, पुण्य