________________
प्रकरण ३१ : विरामचिह्न व लेखन वैशिष्ट्ये
४९३
४) विधेय क. भू. धा. वि. नंतर 'यावि होत्था' या शब्द समूहाचा उपयोग केलेला आढळतो. जुवराया जाए यावि होत्था। (विवाग. पृ. ३८)
५) गत्यर्थक क्रियापदाचा गंतव्याची द्वितीया (वा सप्तमी) न वापरता 'जेणेव-तेणेव, जेणामेव-तेणामेव यांच्या उपयोगाने विश्लेषणात्मक वाक्यरचना केलेली आढळते.
जेणेव सेणिए तया तेणेव उवागच्छंति। (निरया. पृ. ९) जिकडे सेणिय राजा होता तिकडे गेले.
६) जिकडून ज्या ठिकाणाहून-तिकडे, त्या ठिकाणाकडे या अर्थी ‘जामेव दिसिं-तामेव दिसि' असा वाक्यांश वापरला जातो.
जामेव दिसिं पाउब्भूया तामेव दिसिं पडिगया। (निरया. पृ. ७) जिकडून आली तिकडे परत गेली.
१
यस्या दिशः सकाशात् प्रादुर्भूता (आविर्भूता) तामेव दिशं प्रतिगता। (अभयदेव नामा पोथी पृ. ९ ब)