________________
४७४
अर्धमागधी व्याकरण
दळुव्वो। (महा. ४५अ) हा राजाधिराजाचा प्रधान दूत आहे; म्हणून त्याला स्वामीप्रमाणे मानावयाचे (२) सुहुमो---- य सो वत्तए अओ न दीसइ। (समरा. पृ.१६८) तो सूक्ष्म आहे; म्हणून दिसत नाही.
(३) तम्हा :- सूसइ कंठो महं अइनिसाए... तम्हा उदयं समाणेह। (पउम. ३५.३) फार तहानेने माझा घसा शुष्क झाला आहे; म्हणून पाणी आणा.
४४२ एकत्र ठेवून वाक्ये जोडणे
पुष्कळदा जोडणाऱ्या शब्दाविना वाक्ये फक्त एकत्र ठेवून त्यांचा परस्पर संबंध सूचित केला जातो.
(अ) मित्रवाक्य :
(१) कारण :- अलं बालस्स संगेण वेरं वड्डइ अप्पणो। (आचारांग १.१.२.४) ज्यामुळे स्वत:चे वैर वाढते असा मूर्खाचा संग पुरे ।
(२) संकेत :- निमधूयं मे नरवर न देसि पविसामि जलणंमि। (चउ. पृ.२६) हे राजा! जर तूं आपली मुलगी मला दिली नाहीस तर मी अग्नीत प्रवेश करीन.
(३) नामवाक्य :- को जाणइ परे लोए अत्थि वा नत्थि वा पुणो। (उत्त. ५.६) पर लोक आहे की नाही हे कुणास माहीत आहे?
(४) विशेषणवाक्य :- धी संसारसहावो, पुत्तो वि हु दारुणो हवइ वइरी। (सुर १६.१५८) पुत्रहि जेथे दारुण वैरी होतो अशा संसार स्वभावाचा धिक्कार।
(आ) संयुक्त वाक्ये :
(१) समुच्चय :- (क) राया वडरुक्खं पेच्छइ देवि भणइ। (चउ. पृ.१७) राजा वटवृक्ष पहातो (व) राणीला म्हणतो.
(ख) (दोन आज्ञार्थी वाक्ये) :- एह भुंजह। (बंभ. पृ.४५) या (व)
जेवा.
(ग) (वस्तुस्थिति वर्णितांना) :- घोरा मुहुत्ता अबलं सरीरं। (उत्त. ४.६) मुहूर्त (वेळ) भयंकर आहे; शरीर दुबळे आहे.
(घ) (क्रियासंतति सांगतांना) :- पाडियाइं फोलाइं भग्गा कलसगा फोडिया कमंडलु (महा. पृ.१७४ व) फळे पाडली, कलश मंगिले, (व) कमंडलू