________________
४७२
अर्धमागधी व्याकरण
नाही.
(४) न य :- न य हाणी न य वुड्डी होइ। (पएम. ३.४१) हानी हि होत नाही व वृद्धीहि होत नाही.
(५) तयणु :- अइकोउहल्लेणं गहिया मंजरी राइणा तयणु समत्थखंधावारेण वि। (धर्मो. पृ.१२१) अति कुतूहलाने राजाने मंजरी घेतली, नंतर सर्व सैन्याने सुद्धा.
(६) तओपरं :- तओपरं सोगमुवगओ कालसेणो। (समरा. पृ.४२२) त्यावर कालसेण फार शोक करु लागला.
(७) तयणंतरं :- परिचत्तो म्हि तीए। तयणंतरं निग्गओ हं वेसाघराओ। (महा. पृ.२६अ) तिने माझा त्याग केला; तदनंतर मी वेश्यागृहांतून बाहेर पडलो.
(८) पढम-पच्छा :- अओ पढमं दयपेसणेण से मुणिजउ मणं। पच्छा जहाजुत्तं किज्जउ त्ति। (नल. पृ.७) म्हणून, प्रथम दूत पाठवून त्याचे मन जाणून घ्यावे; नंतर योग्य ते करावे.
(९) अन्नं च, अवरं :- एगं हीणजाईओ अण्णंच दारिदं अवरं पुण एरिसं सरीरं। (कथा. पृ.१७५) एक (मी) हीनजातीय आनखी दारिद्र, आणि असले शरीर.
(१०) ताव (प्रथम) तओ :- ताव राया निद्दाए सुवउ तओ कहिस्सं। (चउ. पृ४१) प्रथम राजा झोपी जाऊ दे; मग सांगेन. ४३९ विकल्पदर्शक वाक्यें जोडणे
(१) अन्नहा :- ता देह मह करं इण्डिं अन्नह मह भूमिं सिग्धं परिच्चयह। (सुपास. ४९३) तेव्हा आत्तां मला कर द्या; नाही तर लगेच माझी भूमि सोडा.
(२) इहरा, इयरहा :- (१) वयं चरह। इहरा इहलोए वि हु पाविस्सह तिक्खदुक्खाई।। (सुपास. ६२८) व्रत आचरा; नाहीतर इहलोकीहि तीक्ष्णदुःखे मिळतील. (२) मरणं चिय मज्झ होइ सेयं तु। इयरह लोयावाओ आजम्मो दूसहो नियमा।। (नाण. १.९१) मरणच मला श्रेयस्कर आहे; नाहीतर जन्मभर दुःसह असा लोकापवाद नक्की होईल. (३) जइ रहियं जीवेहिं तो भुंजइ इयरहा वजं। (सुपास. ४९१) जर (अन्न) निर्जीव असेल तर तो खाई, नाही तर (तें) वw.
(३) अहव, अहवा :- वेहल्लं कुमारं पेसेहि अहव जुध्द सजो चिट्ठाहि।