________________
प्रकरण २९ : वाक्ये जोडणे
४७१
(२) फलिअं सुकएण अरिणा --- चलणा तुह जं णिभालिआ। (उसा. २.४) ज्या अर्थी तुझे चरणदर्शन झाले त्याअर्थी पुष्कळ सुकृत फळाला आले असले पाहिजे.
(२) जेण-णं :- (१) एसा जणणीतुल्ला जेणं जिट्ठस्स बंधुणो भज्जा। (सुपास. ४८७) ही मातृवत् आहे, कारण ती ज्येष्ठ बंधूची भार्या आहे. (२) जेणं चिय उद्दामो हिंडइ एसो जयंमि अक्खलिओ। तेणं चिय सप्पुरिसा लग्गा परलोगमगंमि।। (समरा. पृ.१८६) कारण हा उद्दाम अस्खलितपणे जगात हिंडतो; म्हणूनच सत्रपुरुष परलोक मार्गाला लागले आहेत.
(३) इति :- (१) अलाभो त्ति न सोयए। (आचारांग १.२.५.३) लाभ झाला नाही म्हणून शोक करू नये. (२) तुम भणसि त्ति वच्चामो। (वसु. पृ.२४३) तूं म्हणतोस म्हणून जाऊ या.
(४) जाव :- विसजेह मं जाव णं जाणामि। (वसु. ९.१२) मला जाऊं द्या म्हणजे मी जाणून घेईन.
(उ) संकेत :
(१) अह :- अह जाणासि तो भण। (उत्त. २५.१२) जर माहीत असेल तर सांग. (२) चे :- तं कहं इतिचे। (उत्त. १६.२) ते कसे असे जर (म्हणशील तर ऐक) (३) तरिहि :- जइ एवं तरिहि सुंदरतरं। (सुर. ११.७१) जर असे असेल तर फारच चांगले. ४३८ समुच्चयदर्शक वाक्य जोडणे
(१) अवि (अपि) :- न वि रुट्ठो न वि तुट्ठो। (उत्त. २५.९) रागावला हि नाही आणि संतुष्ट हि झाला नाही.
(२) किंपुण :- एएसिं एक्केक्कं पि नूण वेरग्गकारणं गरुयं। किं पुण सव्वेसिं समवाओ।। (महा. पृ.६९ ब) यातील एकेकहि वैराग्याचे मोठे कारण आहे; मग सगळी एकत्र आल्यावर काय सांगावे?
(३) किंच :- किं च पंचवीसहि वि तत्ते हि एग जीवतत्रं न सिज्झइ। (जिन. पृ.३०) आणि असे की पंचवीस तत्त्वांनी हि एक जीवतत्त्व सिद्ध होत
१
घाटगे, पृ. १९६