________________
प्रकरण २८ : संवादित्व
-अहिगारी ।
१) राया समणो मंती दूओ तह चेव धम्म - नियसत्थेण विहीणा कयं पि कज्जं विणासेंति (नाण ९.१९०९) स्वशास्त्र विहीन असा राजा, श्रमण, मंत्री, दूत तसेच धर्माधिकारी हे केलेल्या कार्याचा ही
४६३
नाश करतात.
२) बहवे वेज्जा य वेज्जपत्ता य । (विवाग पृ. ८) पुष्कळ वैद्य व वैद्यपुत्र २) अनेक विशेष्ये 'च' ने जोडलेली असतां त्याचे विशेषण कधी विधि विशेषणाप्रमाणे संनिधच्या विशेष्याप्रमाणे असते.
१) पाइओ मि जलंतीओ वसाओ रुहिराणि य। (उत्त १९.७०) ज्वलंत वसा व रक्त मला पाजण्यात आले. २) अन्ने देवा य देवीओ य । (महा पृ. १३७ इतर देव आणि देवी.
आ) संख्याविशेषण' - विशेष्य-संवाद :
:
१) 'एग' हे विशेष्याच्या लिंग-वचन विभक्तीप्रमाणे असते.
१) मम एगो भाया। ( कथा पृ. ६०) माझा एक भाऊ २) संपाहि मे एगं पत्थणं। (समरा. पृ. १६४) माझी एक प्रार्थना पुरी कर ३) एगेण साहुणा । (समरा पृ. १८५) एका साधूने.
२) दोन ते अठरा ही संख्याविशेषणे नेहमी अ. व. त. असतात. तीनही लिंगी त्यांची रूपे समान आहेत. विभक्ति तेवढी विशेष्याप्रमाणे असेत.
१) चोद्दस महारयणा नव निहओ । ( पउम ४.६१) चौदा महारत्ने, नऊ
निधी.
२) दस अज्झयणा । ( विवाग पृ २) दहा अध्ययने ३) अट्ठेव य कम्माई एगारस पडिमाओ बारस वयाई । (सिरि ६४ ) आठच कर्मे, अकरा प्रतिमा बारा व्रते ४) सोलस वरवावीओ । ( पउम २.५२) सोळा सुंदर वापी.
१
संख्यावाचकांच्या समासांत होणाऱ्या फरकासाठी प्रकरण १२, पुरवणी २
२
पहा.
वीसच्या पुढील संख्यावाचके ही विशेष्यासारखीच असल्याने ती कधी विशेष्याची षष्ठी घेतात. उदा. वरगामाण सहस्सं सयं गइंदाण पाइक्काणं लक्खं तुरयाणं दस सहस्साइं । ( अगड . १५३) एक हजार सुंदर गांवे, शंभर उत्कृष्ट हत्ती, एक लक्ष पायदळ, दहा हजार घोडे