________________
प्रकरण ३ : स्वरविकार
४३
युष्मादृश = तुम्हारिस (तुमच्यासारखा), यादृश = जारिस (जसला), एतादृश = एयारिस (ह्यासारखा), मादृश = मारिस (माझ्यासारखा), अन्यादृश = अन्नारिस (दुसऱ्यासारखा).
२७ एकाच शब्दात होणारे ह्रस्व ऋ चे अनेक विकार पुष्कळदा एकाच
शब्दातील ह्रस्व ऋ चे अनेक विकार होतात. असे काही शब्द पुढे दिले आहेत
ऋषि = इसि, रिसि; ऋद्धि = इड्डि, रिद्धि; ऋण = अण, रिण; मातृ = माई, माउ; कृष्ण = कण्ह, किण्ह ; प्राकृत : पागय, पाइय; पृष्ठ = पिट्ठ, पुट्ठ (पाठ); बृहस्पति = बहस्सइ, बिहस्सइ; मृगांक = मियंक, मयंक; मृग = मय, मिग; ऋक्ष = अच्छ, रिच्छ (अस्वल); भ्रातृ-वत्सल = भाइवच्छल, भाउवच्छल; भ्रातृ-घातक = भाइघायग, भाउघायग (भावाचा घात करणारा), ऋतु = उउ, रिउ; ऋषभ = उसभ, रिसभ ; तृण = तण, तिण; वृक = वग, विग; भ्रातृ = भाइ, भाउ; मृत्यु = मच्चु, मिच्चु.
२८ धातूत होणारे ह्रस्व ऋ चे विकार
(अ) ह्रस्व ऋकारान्त धातूत ऋचा अर' होतो. ___मृ = मर (मरणे), कृ = कर (करणे), धृ = धर (धरणे), सृ - सर (सरणे), हृ = हर (हरण करणे)
(आ) ह्रस्व ऋ असलेल्या एकावयवी (एकस्वरी) धातूत ऋ चा अरि झालेला आढळतो.
कृष् = करिस (ओढणे), वृष् = वरिस (वृष्टि करणे), मृष् = मरिस (क्षमा करणे), हृष् = हरिस (आनंदित होणे).
२९ ह्रस्व ऋ चे अनियमित विकार
ह्रस्व ऋ चे वर सांगितलेल्या विकाराखेरीज इतर काही विकार होतात, त्यांना अनियमित म्हणण्यास हरकत नाही. हे विकार असे :
१
म. : करणे (कृ), मरणे (मृ), सरणे (सृ), भरणे (भृ), स्मरणे (स्मृ).