________________
३२८
छीरं। (२) (सो विचित्तं आहारं भुंजित्था । तं विचित्तं आहारं भुंजावित्था।) (सो) भुंजाविओ विचित्तं आहारं ।
अर्धमागधी व्याकरण
(२) मूळ धातु सकर्मक असता प्रयोजक कर्मणि रचनेत मूळ कर्म प्रथमेत जाते आणि मूळ कर्ता व प्रयोजक कर्तरि रचनेतील कर्ता हे तृतीयेत जातात. 'कर' (कृ) या धातूच्या बाबतीत मात्र प्रयोजक कर्तरीत मूळ कर्त्याची विकल्पाने द्वितीया असते, म्हणून प्रयोजक कर्मणि रचनेत मूळ कर्ता पुष्कळदा प्रथमेत येतो. प्रयोजय कर्मणि क्रियापद हे प्रथमेतील शब्दाच्या पुरुषवचनाप्रमाणे असते. उदा.
(१) करिओ तेण महरिसी दुध्दपारणयं । (२) मए एयं रायविरुध्दं काराविओ (एसो) । (३) तुब्भेहिं एस रज्जं कारेयव्वो । (४) तीए वि कारविओ (सो) भोयणाईयं। (५) ते जिणवरेण सम्मं मुणिदिक्खं गाहाविया सव्वे । (६) गाहिओ सो पिउणा कलाकलावकोसल्लं । (७) सो गुरुणा गाहिओ जिणिंददिक्खं । (८) अहं किर पुव्वं सिक्खं गाहिओ मंतीहिं । (९) विवाहाविओ (सो) गुरुहिं इब्भ बालियं। (१०) तेण पणामपुव्वं खमाविओ निययावराहं नलो । (११) दिव्वेण (दैव) रज्जब्भंसं लहाविओ नलो। (१२) सो नलेण हाराविओ सव्वं। ३०४ प्रयोजक धातु : प्रयोग बदल
प्रयोजक धातूंच्या कर्तरि व कर्मणि प्रयोगबदलाची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
(अ) कर्तरि - कर्मणि :
(क) (१) अरिट्ठनेमी पउमावई सयमेव पव्वावेइ । अरिट्ठनेमिणा पउमावई सयमेव पव्वाविज्जइ। (२) सुराहिवइणो ण्हवंति जयगुरुं । सुराहिवईहिं हविज्जइ जयगुरु। (३) तं कुमारो नच्चावेइ । सो कुमारेण नच्चाविज्जइ । ( ४ ) पंचविहपमाओ जीवं पाडेइ संसारे। पंचविहपमाएण जीवो पाडिज्जइ संसारे ।
(ख) (१) विजए चोरसेणावई चिलायं तक्करं बहूओ चोरविज्जओ सिक्खावेइ।
१
२
संस्कृतमधील हा नियम अर्धमागधीत पाळला गेलेला दिसत नाही: प्रयोजक रचनेतील कर्ता तृतीयेत जातो, पण मूळचे कर्तृपद प्रयोजक कर्मणि रचनेत प्रथमेत गेलेले आढळते.
'कर' धातूला आदेश ठेऊन अर्धमागधीत सकर्मक क्रियापदांचे प्रयोजक कर्मणि प्रयोग बदललेले दिसतात.