________________
३२२
अर्धमागधी व्याकरण
(१) तो विमलेण भणियं-सव्वं चिय मे तए दिन्न। (२) मए भणियं- न याणामि।
(ख) वि.क.धा.वि. चा उपयोग असता :(१) मए तयन्नेसणनिमित्तं कत्थ गंतव्व। (२) न तए कुप्पियव्वं।
(३) तुब्भेहिं जइयव्वं। (यत्) (४) तए इहेव चिट्ठियव्वं। ३०२ प्रयोग बदल
हे प्रयोग परस्पराबद्दल योजावयाचे झाल्यास हे प्रयोग परिवर्तन काही विशिष्ट प्रकारेच होते:- सकर्मक कर्तरि (कर्म उक्त) व कर्मणि ही एक जोडी आहे, अकर्मक कर्तरि व भावे ही दुसरी जोडी आहे. प्रयोग बदल होताना तो एका जोडीतच बदलतो, जोडीबाहेर नाही. म्हणजेच सकर्मक कर्तरीचा (कर्म उक्त) कर्मणि होऊ शकेल आणि कर्मणीचा सकर्मक कर्तरि, तसेच अकर्मक कर्तरीचा भावे व भावे प्रयोगाचा अकर्मक कर्तरि होऊ शकतो. प्रयोगांचा हा परस्पर संबंध पुढील प्रमाणे दाखविता येईल :
(अ) क्रियापदाचा उपयोग असता :(१) सकर्मक कर्तरि (कर्म उक्त)
कर्मणि (२) अकर्मक कर्तरि
भावे (आ) धातुसाधित विशेषणाचा उपयोग असता:(क) क.भू.धा.वि.चा उपयोग असता:(१) सकर्मक कर्तरि
कर्मणि (२) अकर्मक कर्तरि
कर्तरि (ख) वि.क.धा.वि. चा उपयोग असता : (१) सकर्मक कर्तरि
कर्मणि (२) अकर्मक कर्तरि
भावे प्रयोग बदलतांना पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत :(१) प्रयोग बदलताना कर्ता व कर्म आणि (असल्यास) त्यांची विशेषणे
१ क्रियापद सकर्मक असून पुढील वाक्य कर्म असल्यास त्या कर्तरीचाही भावे प्रयोगच
होतो. परिच्छेद ३०१ पहा.