________________
प्रकरण १७) साधित शब्द : धातुसाधित अव्यये
888888888888888888888888888888888888888888888888888888
२७५ पूर्वकालवाचक धातूसाधित अव्यय : ल्यबन्त
अर्धमागधीतील पूर्वकालवाचक धातूसाधित अव्यये विविध प्रत्यय जोडून सिद्ध केली जातात.
(क) ल्यबन्ताचे नेहमीचे प्रत्यय असे :(१) (अ) अकारान्त धातूंना इऊण, इऊणं हे प्रत्यय जोडून :
(१) जाण-जाणिऊण, सिक्ख-सिक्खिऊण, हस-हसिऊण, वंद-वंदिऊण, हण-हणिऊण, पाव-पाविऊण, सुण-सुणिऊण, गेण्ह-गेण्हिऊण, बंध-बंधिऊण.
(२) जाण-जाणिऊणं, पास-पासिऊणं, नम-नमिऊणं, बंध-बंधिऊणं, जंप-जंपिऊणं, छिंद-छिंदिऊणं, परिभम-परिभमिऊणं, उवउंज-उवउंजिऊणं.
(आ) अकारान्तेतर धातूंना ऊण', ऊणं हे प्रत्यय जोडून :(१) ण्हाऊण, दाऊण, ठाऊण, नाऊण, काऊण, पाऊण (२) काऊणं, नाऊणं, दाऊणं, ठाऊणं
(३) हसेऊण, संमाणेऊण, भेसेऊण; आणेऊण, जेऊण (ज-जि), पराजेऊण, उवणेऊण, नेऊण; होऊण
(४) गहेऊणं, पन्नवेऊणं, भरेऊणं, उठेऊणं; होऊणं.
१
क्त्वास्यादेर्णस्वोर्वा। (हेम. १.२७) ('ण' वर विकल्पाने अनुस्वार) (अ) आकारान्त धातूपुढे 'य' आल्यास प्रहा-हाय-हाइऊण (आ) मराठीत ‘ऊन' असा प्रत्यय पूर्व. धातु. अव्ययाचा आहे. उदा. करून, देऊन, घेऊन, जाऊन, येऊन, न्हाऊन, खाऊन, मारून, पाहून.