________________
२७२
अर्धमागधी व्याकरण
(इ) काही व.का.धा.वि. ची रूपे संस्कृतमधून वर्णान्तराने अर्धमागधीत आलेली आहेत. पण अर्धमागधीत त्यांचा उपयोग पुष्कळदा क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे केलेला आढळतो. उदा. जयं (दक्षतेने), अजयं. २६६ वर्तमानकालवाचक कर्मणि धातुसाधित विशेषण
परिच्छेद २६२ मध्ये म्हटल्याप्रमाणे धातूंची कर्मणि अंगे ही अकारान्त असतात. या अकारान्त कर्मणि धातूंना 'अंत' व 'माण' हे प्रत्यय जोडून वर्तमानकालवाचक कर्मणि धातु. विशेषणे सिद्ध होतात.
ए-एज-एजंत, एज्जमाण ; पिव-पिज्ज-पिजंत, पिज्जमाण ; दे-दिज-दिजंत, दिजमाण; हण-हम्म-हम्मत, हम्ममाण; पाव-पाविज्ज-पाविजंत, पाविज्जमाण; परिघट्ट-परिघट्टिज-परिघट्टिजंत, परिघट्टिजमाण. २६७ कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण
(अ) धातूंना ‘इय' हा प्रत्यय जोडून क.भू.धा.वि. सिद्ध होतात. भणभणिय, चिंत-चिंतिय, पड-पडिय, इच्छ-इच्छिय, समोसर-समोसरिय, तवतविय, रक्ख-रक्खिय, पुच्छ-पुच्छिय.
(आ) प्रयोजक धातूंना ‘इय' प्रत्यय लावण्यापूर्वी धातूंच्या अन्त्य 'ए' चा लोप केला जातो.
कारे-कारिय, हासे-हासिय, पाढे-पाढिय; करावे-कराविय, कारावे-काराविय, कहावे-कहाविय, हारावे-(हर/ह)-हाराविय, पइट्ठावे-पइट्ठाविय, गवेसावेगवेसाविय, आणावे-आणाविय, लिहावे-लिहाविय, पिहावे-पिहाविय, सजावे (सज्ज) सज्जाविय, घोसावे-घोसाविय, वाहरावे-वाहराविय. २६८ अनियमित क.भू.धा.वि.
अर्धमागधीतील कित्येक क.भू.धा.वि. संस्कृतमधून वर्णान्तराने आलेली आहेत. त्यांना अनियमित म्हणण्यास हरकत नाही. तसेच इतर काही धातूंचीही काही अनियमित क.भू.धा.वि. आढळतात. ती अशी :
(अ)
१ घाटगे, पृ.१३२ व.का.धा.वि.चे उपयोग परिच्छेद ४२१ पहा.