________________
प्रकरण १६ : साधित शब्द : धातुसाधित विशेषणे
(२) एकारान्त व ओकारान्त धातूंच्या पुढे 'अंत' प्रत्ययातील आद्य 'अ' चा लोप होतो. माण प्रत्यय तसाच लागतो. १
२७१
(क) 'अंत' प्रत्यय जोडून :- कर'-(करे)-करेंत, पलोय - (पलोए) - पलोएंत, उज्जोय-(उज्जोए)-उज्जोएंत; ने-नेंत, दे देंत, ए (आ+इ) एंत, बे (ब्रू) - (बेंत) - बिंत, हो-होंत-(हुंत).
(ख) 'माण' प्रत्यय जोडून :- कर-करे - करेमाण, फुर-फुरे - फुरेमाण, आहार - आहारे-आहारेमाण, पत्थ- पत्थे - पत्थेमाण.
(३) आकारान्त धातूंच्या पुढे 'अंत' व 'माण' प्रत्ययापूर्वी प्राय: ' 'य’ येतो. गा-गाय-गायंत, गायमाण; वा वाय-वायंत; ठा-ठाय-ठायमाण; झियाझियाय - झियायमाण, झा-झाय-झायंत.
(आ) व.का.धा.वि. सिद्ध करण्याचे 'अंत' व 'माण' हे नेहमीचे प्रत्यय आहेत. त्याखेरीज इतर काही प्रत्यय लागून सिद्ध झालेली व.का.धा.वि. कधी कधी आढळतात.
(१) 'मीण' प्रत्यय लागून :- आगम-आगममीण, आढाय - आढायमीण, भिस-भिसमीण, भिब्भिस - भिब्भिसमीण, आसाय - आसाए - आसाएमीण. (२) 'आण' प्रत्यय लागून :- • विहम्माण, वक्कमाण (३) 'ईण' प्रत्यय लागून :- आसीण, मेलीण.
(४) 'अस' धातूची 'संत' व 'समाण' अशी व.का.धा.वि. होतात.
१ एकारान्त धातूंना अंत व माण हे प्रत्यय लागण्यापूर्वी कधी मध्ये 'य' येतो. उदा. आणेयंती, देयमाण इत्यादी.
३
२ येथे अकारान्त धातूंच्या अन्त्य 'अ' चा प्रत्ययापूर्वी 'ए' झालेला आहे. मार्कंडेयाच्या मते (अत एव माण: स्यात् । ६.१९), फक्त अकारान्त धातूंनाच 'माण' प्रत्यय जोडला जातो. तथापि, हेमचंद्र (३.१८०) 'होमाण' असे एक रूप देतो.
कधी हा 'य' येत नाही. उदा. जा-जंत.
तसेच, अणासायमीण, अममायमीण, अपरिग्गहमीण.
तसेच 'बुवाण' (ब्रू) (उत्त. २३.३१)
हे रूप वक्कममाण ऐवजी वापरले जाते.
४
५
६
७