________________
२५६
अर्धमागधी व्याकरण
पासम्मि, समक्खं; अट्ठाए, कज्जे, कए (कृते) साठी इत्यादी.
(आ) काही शब्दयोगी अव्यये धातू (व धातूसाधिते) यांच्या मागे उपसर्ग म्हणून येतात. असे दोन वा अधिक उपसर्गही एकाच धातूच्या मागे येऊ शकतात. उदा. अणुपविसति, पाडिनिक्खमइ, उवागच्छइ इत्यादी
__ या उपसर्गांना स्वत:चा असा स्वतंत्र अर्थ असतो :- धातू (वा धातुसाधितां) पूर्वी ते आले असता, ते कधी धातूंचा अर्थ बदलतात, कधी मूळ अर्थ जोरदर्शक (प्रकर्षवाचक)२ करतात, तर कधी धातूंच्या अर्थात काहीच बदल करीत नाहीत.
हे उपसर्ग संस्कृतमध्ये असे आहेत. प्र, परा, अप, सम्, अनु, अव, निर्, दुर्, अभि, वि, अधि, सु, उत्, अति, नि, प्रति, परि, अपि, उप, आ याखेरीज निस् व दुस् असे आणखी दोन उपसर्ग मानले जातात.५ ।
याखेरीज, इतर काही शब्द- ज्यांना संस्कृतमध्ये ‘गति' अशी संज्ञा आहे, उपसर्गाप्रमाणे धातूंच्या मागे येतात. उदा. (१) प्रादुस् (पाउ) (२) नमस् (नम, नमो) (३) अस्तं (अत्थं) (४) तिरस् (तिर, तिरो) (५) पुरस् (पुर, पुरो) (६) आविस् (आवि) इ.
खाली प्रत्येक उपसर्गयुक्त धातूंची काही उदाहरणे उपसर्गांच्या काही ठळक अर्थासह दिली आहेत :(१) अइ (अति), पलीकडे :- अइक्कमइ, अइगच्छइ. (२) अणु (अनु), नंतर, मागे, बरोबर :- अणुकरेइ, अणुजाणइ, अणुगच्छइ. (३) अभि, अहि (अभि), कडे :- अभिगच्छइ, अभिवड्डइ, (अहिगण). (४) अप, अव, ओ (अप), दूर, खाली, वाईट :- अवरज्झइ, अप्सरइ, १ उपसर्गेण धात्वर्थो बलादन्यत्र नीयते। २ धात्वर्थं बाधते कश्चित् कश्चित्तमनुवर्तते।
तमेव विशिनष्ट्यन्योऽनर्थकोऽन्यः प्रयुज्यते।।
हेच उपसर्ग अर्धमागधीत वर्णान्तराने आलेले आहेत. ४ प्रपरापसमन्ववनिर्दरभिव्यधिसूदतिनिप्रतिपर्यपयः।
उप आङिति विंशतिरेष सखे! उपसर्गगण: कथितः कविना।। कातंत्र व्याकरण ५ वा. वे. आपटे, पृ. ५ ६ काळे, पृ. २२८