________________
प्रकरण १३ : धातुरूपविचार
टीप : १) प्र. पु. ए. व. त कधी 'इहं' असा प्रत्यय लागतो.
२) प्र. पु. ए. व. आणि प्र. पु. अ. व. यामध्ये कधी कधी 'इहामि' व 'इहामो' असे प्रत्यय' लागतात.
३) तृ. पु. ए. व. तील 'इहिइ' प्रत्ययांत 'हि' व 'इ' चा संधि होऊन 'इही' होतो. म्हणून 'इही' असा एखादा स्वतंत्र प्रत्यय मानण्याचे कारण नाही.
आ) क) पहिल्या प्रकारच्या प्रत्ययापूर्वी होणारे फेरफार :
२
१) अकारान्त धातूंच्या अन्त्य 'अ' चा प्रत्ययापूर्वी लोप होतो पास + इस्सामि = पासिस्सामि
२) आकारान्तरॆ धातूपुढे प्रत्ययांतील आद्य 'ई' तसाच राहतो. उदा. ठाइस्सामि, निव्वाइस्सइ ( निर्वा) इ.
३) एकारान्त४ व ओकारान्त धातूंचे पुढे प्रत्ययांतील आद्य ‘इ’ चा विकल्पाने लोप होतो'.
१
२
३
४
२३७
५
ख) दुसऱ्या प्रकारच्या प्रत्ययापूर्वी होणारे फेरफार :
१) अकारान्त धातूंच्या अन्त्य 'अ' चा सर्व प्रत्ययांपूर्वी लोप होतो उदा. पासिहिमि इ.
क्वचित्तु हा न भवति । हेम : ३. १६७
भविष्यकाळात द्वितीय वर्गीय अकारान्त धातु प्रथमवर्गीय अकारान्त धातूप्रमाणे वा त्याचे अंग एकारान्त होऊन ते 'ने' प्रमाणे चालत असल्याने, पुढे द्वितीय वर्गीय धातूची नमुन्याची रूपे दिलेली नाहीत. भूतकाळ, परि २३०, टीपेतील हेमचंद्राचे मत पहा
हाच नियम निराळ्या शब्दांत पुढीलप्रमाणे सांगता येईल : एकारान्त व ओकारान्त धातूपुढे प्रत्ययांतील आद्य 'ई' चा लोप होतो. त्याच धातूपुढे 'अ' (य) आगम झाल्यास प्रत्ययापूर्वी या 'अ' चा लोप होतो. भूतकाळ, तळटीपेतील हेमचंद्राचे मत पहा.
घाटगे
पृ. १२७ : प्रत्ययांतील आद्य 'ई' चा लोप होऊन झालेलीच रूपे प्रायः वाङ्मयांत आढळतात. म्हणून पुढे दिलेल्या नमुन्याच्या रूपांत 'ई' चा लोप झालेली रूपेच दिलेली आहेत.