________________
प्रकरण १३ : धातुरूपविचार
आ) धातूला प्रत्यय जोडण्यापूर्वी होणारे विकार :
१) प्र. पु. ए. व. आणि प्र. पु. अ. व. यांतील प्रत्ययापूर्वी प्रथमवर्गीय अकारान्त धातूंच्या अन्त्य 'अ' चा 'आ' होतो. उदा. हसामि, हसामो
२) प्रथम वर्गातील धातूंचा अन्त्य 'अ' आणि तृ. पु. अ. व. ‘अन्ति’ प्रत्ययांतील आद्य ‘अ’ या दोहोंचा मिळून पुढे 'न्ति' हे जोडाक्षर असल्याने 'अ' च राहतो. उदा. हस + अन्ति = हसन्ति
२२९
३) द्वितीय वर्गातील अकारान्त धातूंच्या अन्त्यय 'अ' चा सर्व प्रत्ययापूर्वी 'ए' केला जातो. उदा. करेमि, करेह, करेइ इ.
४) द्वितीय वर्गातील धातूंच्या एकारान्त अंगापुढे तृ. पु. अ. व. ‘अंति’ प्रत्ययातील आद्य 'अ' चा लोप होतो. उदा. करे + अंति करेंति
२
=
५) तृतीय वर्गातील एकारान्त व ओकारान्त धातू पुढे तृ. पु. अ. व. ‘अंति' प्रत्ययातील आद्य 'अ' चा लोप होतो. उदा. ने + अंति = नेंति, हो + अंति होंति१ इतर प्रत्यय मात्र नुसते जोडावयाचे उदा. नेमि, होमो इ. ६) तृतीय वर्गातील आकारान्त धातु :
क) काही आकारान्त धातूंच्या पुढे सर्वच प्रत्ययांपूर्वी 'य' येतो. त्यानंतर
ते प्रथमवर्गातील अकारान्त धातूप्रमाणे चालतात. उदा. झिया-झियाय
पण
ख) काही आकारान्त धातूंच्या पुढे फक्त तृ. पु. अ. व. 'अंति’२ प्रत्ययापूर्वी 'य' येतो३. उदा. गा + अंति = गा + य + अंति गायंति, काही आकारान्त धातूंच्या पुढे इतर प्रत्ययापूर्वी तसेच 'अंति' प्रत्ययापूर्वी सुद्धा 'य'४ येत नाही.
१
या रूपात पुढे ‘न्ति' हे जोडाक्षर असल्याने मागील ए, ओ बद्दल कधी अनुक्रमे इ, उ लिहिले जातात.
मार्कंडेयाच्या मते ‘नित्यमन्त्यन्त्वोः। - अन्ति-अन्तोः परमोः धात्वाकारात् अकारो नित्यं स्यात्। मार्कं ७.६१
३
ही वस्तुस्थिती काही आकारान्त धातूंच्या पुढे 'अंति’ हा प्रत्यय ‘यंति’ होतो, या शब्दांत डॉ. घाटगे (प. ११५) यांनी व्यक्त केली आहे.
=
=
४ वाङ्मयीन प्रयोगावरून हा 'य' केव्हा येतो व केव्हा येत नाही, हे जाणून घेतले पाहिजे.