________________
प्रकरण १३ : धातुरूपविचार
२२७
६) अर्धमागधीत संकेतार्थाचे स्वतंत्र प्रत्यय नाहीत, आज्ञार्थ आणि विध्यर्थ? यांचे तेवढे स्वतंत्र प्रत्यय आहेत.
२२४ अर्धमागधीतील धातूंचे वर्ग
अर्धमागधीत संस्कृतप्रमाणे धातूंचे गणभेद नाहीत, हे वर सांगितले आहेच. तथापि चालविण्याच्या सोईसाठी (प्रत्ययापूर्वीच्या) धातूंच्या अन्त्य स्वरानुसार जास्तीत जास्त तीन विभागात त्यांची विभागणी करता येते. या विभागांना सोईसाठी ‘वर्ग' म्हटले आहे.
१) प्रथम वर्ग : या वर्गात सर्व अकारान्त धातू येतात. उदा.
गच्छ, रम, पड, भण इत्यादि अर्धमागधीतील बहुसंख्य धातू हे अकारान्त असल्याने अर्धमागधीतील बहुसंख्य धातु प्रथम वर्गात येतात. (२) द्वितीय वर्ग : या वर्गातील धातुही अकारान्तच आहेत. परंतु काही प्रत्ययांपूर्वी त्यांच्या अन्त्य अ चा कधी कधी ए होतो. म्हणून सोईसाठी त्यांचा द्वितीय वर्ग मानला आहे. ३) तृतीय वर्ग : अकारान्त खेरीज इतर स्वरान्त - धातु - आकारान्त (मूळचेच) एकारान्त व ओकारान्त धातु - तृतीय वर्गात येतात. उदा. गा, झिया, ने, हो इत्यादि. १ अर्थावरून आज्ञा, कर्तव्य इत्यादींचा बोध होतो. २ हेमचंद्राने म्हटल्याप्रमाणे (एच क्त्वा-तुम-तव्य-भविष्यत्सु १३.१५७
व पंचमी-शतृषु वा। ३.१५८) वर्तमान, भविष्य, ल्यंबत, तुमंत व वि. क. धा. वि. यांच्या प्रत्ययांपूर्वी अन्त्य अ चा ए होतो, आज्ञार्थ (पंचमी)
व व. का. धा. वि. (शतृ) प्रत्ययांपूर्वी विकल्पाने ए होतो. ३ प्रथम व द्वितीय वर्गातील धातु हे परस्पर व्यावर्तक म्हणजे एका वर्गातला
दुसऱ्या वर्गात जात नाही, असे - नाहीत अकारान्त धातु कधी प्रथमवर्गीय धातूंप्रमाणे, तर कधी अन्त्य अ चा ए करून द्वितीय वर्गीय धातूंप्रमाणे चालविले जातात. हीच तन्हा द्वितीय वर्गीय धातूंच्या बाबतीत
आहे. ४ कधी कधी अकारान्त धातूपुढे 'य' हा आगम येऊन ते अकारान्त होतात.
मग ते अकारान्त धातूंप्रमाणेच चालविले जातात.