________________
प्रकरण १३) धातुरूपविचार
888888888888888888888888888888888888888888888888888888
२२३ संस्कृत व अर्धमागधी धातुरूपे : तौलनिक विचार
संस्कृतप्रमाणे अर्धमागधीतील धातुरूपविचार किचकट व गुंतागुंतीचा नाही. पुढील कारणांनी ही कठिणता कमी झाली आहे.
१) संस्कृतमधले धातु स्वरान्त तसेच व्यंजनान्त आहेत. अर्धमागधीतील सर्वच धातु स्वरान्त असल्याने व्यंजनान्त धातु चालविण्याचा त्रास नाही.
२) अर्धमागधीत द्विवचन नसल्याने धातूंची द्विवचनातील रूपे सिध्द करण्याचा प्रश्नच उरत नाही. अर्धमागधीतील धातु ए. व. आणि अ. व. या फक्त दोनच वचनात चालतात.
३) संस्कृतातल्याप्रमाणे धातूंचे गण, विकरणे इत्यादि सोपस्कारांचा विचार अर्धमागधी धातुरूपविचारात नाही.
४) संस्कृतमधील धातूंचा पदभेद-म्हणजे धातु परस्मैपदी, आत्मनेपदी अथवा उभयपदी-अर्धमागधीत नाही. अर्धमागधीत धातूंना लागणारे प्रत्यय हे संस्कृतमधल्या फक्त परस्मैपदी' प्रत्ययावरून प्रायः आलेले आहेत.
५) संस्कृतप्रमाणे भूतकाळ२ व भविष्यकाळ यांचे अनेक प्रकार अर्धमागधीत नाहीत. अर्धमागधीत फक्त तीन काळ-वर्तमान, भूत, भविष्य-आहेत व त्यांचा प्रत्येकी एकेकच प्रकार आहे. १ वाङ्मयात कधी कधी धातूंची आत्मनेपदी-प्रत्ययान्त रूपेही आढळतात.
त्यांना अनियमित म्हणण्यास हरकत नाही. २ संस्कृतमधील धातूंच्या भूतकाळाच्या काही वर्णान्तरित रूपांचा वापर
वाङ्मयात आढळतो. त्यांना अनियमित म्हणण्यास हरकत नाही. ३ काळावरून क्रिया केव्हा घडत आहे, याचा बोध होतो.