________________
प्रकरण १२ : विशेषणरूपविचार
२२१
(उ) शंभर' :
‘सय' हे अकारान्त नामाप्रमाणे पुल्लिंगात वा नपुं. त आणि एकवचनात तसेच अनेकवचनात चालते. २२१ शंभराचे पुढील संख्यावाचके व त्यांची रूपे । (अ) एक हजार (१०००) : सहस्स, साहस्सी
सहस्स हे अकारान्त नामाप्रमाणे पुल्लिंगात व नपुं. त चालते. साहस्सी हे
स्त्रीलिंगात चालते. (आ) दहा हजार (१०,000) : अजुय (अयुत) : अकारान्त नामाप्रमाणे (इ) एक लक्ष : लक्ख : अकारान्त नामाप्रमाणे (ई) कोटि : कोडि : स्त्रीलिंगात चालते. (उ) कोडाकोडि (एकावर १४ पूज्ये)३ : हा शब्द स्त्रीलिंगात चालतो. (ऊ) पलिओवम : (एक वा शंभर योजने लांब, रुंद व खोल असलेली विहिर
केसांनी इतकी गच्च भरावयाची की एखादी नदी जरी तिच्यावरुन वाहत गेली तरी विहिरीत पाण्याचा एकही थेंब शिरणार नाही. अशा विहिरीतून दर शंभर वर्षांनी एक केस काढून टाकत, सर्व विहिर केसरहित होण्यास जितका काळ लागेल, तितका काळ म्हणजे पलिओवम४) 'पलिओवम' हे अकारान्त नामाप्रमाणे चालते. सागरोवम : (१० कोडाकोडि x पलिओवम) हेही अकारान्त नामाप्रमाणे चालते.
१ सय ते सागरोवम पर्यंतची संख्यावाचके आपापल्या अन्य स्वरानुसार त्या
त्या स्वरान्त नामाप्रमाणे, एकवचनात तसेच अनेकवचनातही चालतात.
(वैद्य, पृ. ४५) २ दस सया, दस सयाइं सुद्धा ३ सयसहस्स, समसाहस्सी सुद्धा ४ जैन, पृ. २० ५ वैद्य, पृ. ४५