________________
२२०
अर्धमागधी व्याकरण
(३) स. : तीसुं (३) ष.२ : चउण्ह
(आ) (१) तृ. : तिहिं (२) ष.१ : तिण्ह (इ) (१) तृ.: चउहिं (२) पं. : चउहितो (४) स. : चउसु, चऊसुं (ई) (१) ष.३ : पंचण्ह (२) स. : पंचसुं
२२० सहा ते शंभर पर्यंतची संख्यावाचके : रूपविचार (अ) सहा ते अठरा :
सहा ते अठरा पर्यंतची संख्यावाचके 'पंच'प्रमाणे चालतात. ___म्हणजेच ती फक्त अ. व. त चालतात आणि तीनही लिंगात रूपे समान असतात. उदा. : छ छ छहिं छण्हं छसु; सत्त, सत्त, सत्तहिं, सत्तण्हं, सत्तसु; अट्ठ, अट्ठ, अट्ठहिं, अट्ठण्ह, अट्ठसु ; नव, नव, नवहिं, इ.; दस, दस, दसहिं, दसण्ह, दससु, इ.; बारसहिं, चोद्दसण्हं, पण्णरससु इत्यादी. (आ) १९ ते ४८ :
१९ ते ४८ ही संख्याविशेषणे नेहमी एकवचनात चालतात (मग विशेष्याचे वचन कोणतेही असो). तसेच ही विशेषणे पुल्लिंगात व नपुं. त अकारान्त नामाप्रमाणे आणि स्त्रीलिंगात आकारान्त (वा इकारान्त) नामाप्रमाणे चालतात. (इ) ४९ ते ५८ :
४९ ते ५८ ही संख्यावाचके नेहमी अनेकवचनात चालतात. त्यांची रूपे 'पंच'प्रमाणे होतात.४ (ई) ५९ ते ९९ : __ ५९ ते ९९ ही संख्यावाचके फक्त एकवचनात चालतात (मग विशेष्याचे वचन कोणतेही असो). ही विशेषणे, प्रथमेत व द्वितीयेत (इकारान्त) नपुं. नामाप्रमाणे चालतात व पुढील विभक्तीत (इकारान्त) स्त्रीलिंगी नामाप्रमाणे चालतात. १. गांधी, पृ. ६७ २ . गांधी, पृ. ६७ ३. गांधी, पृ. ६७ ४ वैद्य. पृ. ४५; जैन, पृ. १९. तसेच प्रथमा व द्वितीया सोडून इतर विभक्तीत
४९-५८ ही विशेषणे कधी कधी स्त्रीलिंगी आकारान्त नामाप्रमाणे चालतात. (जैन. पृ. १९)