________________
प्रकरण १२) विशेषणरूपविचार
888888888888888888888888888888888888888888888888888888
२१५ प्रास्ताविक
नाम, सर्वनाम याप्रमाणे अर्धमागधीतील सर्व विशेषणेही स्वरान्तच आहेत. विशेषणे ही मुख्यत: दोन प्रकारची? – गुणवाचक व संख्यावाचक आहेत.
यापैकी गुणविशेषणांचा रूपविचार स्वतंत्रपणे करण्याची जरुरी नाही. कारण ती आपापल्या अन्त्य स्वरानुसार त्या त्या स्वरान्त पुल्लिंगी व नपुंसकलिंगी नामाप्रमाणे चालतात. उदा. सेय (श्वेत), रत्त (रक्त), सुरहि (सुरभि), दुरभि, उज्जु (ऋजु), बह, साउ (स्वाद) इ. स्त्रीलिंगात ही विशेषणे आ२, इ, ई, उ, ऊ - कारान्त स्त्रीलिंगी नामाप्रमाणे चालतात.
म्हणून विशेषणरूपविचारात फक्त संख्यावाचक विशेषणांचाच विचार
१
अर्धमागधीतील सर्व धातुसाधित विशेषणे ही अकारान्त आहेत. ती अकारान्त पुल्लिंगी व नपुं. नामाप्रमाणे चालतात. त्यांची स्त्रीलिंगी रूपे अन्ती आ वा ई जोडून होतात, मग ती अंगे आकारान्त व ईकारान्त स्त्रीलिंगी नामाप्रमाणे चालतात. अकारान्त गुणविशेषणे, स्त्रीलिंगात आकारान्त अथवा ईकारान्त होतात. 'स्त्रीलिंगरूपसिद्धि', परिच्छेद २८६ पहा. कइ (कति) व कइवय (कतिपय) ही अनिश्चित संख्यावाचके आहेत. संख्यावाचकापासून जी क्रमवाचक इत्यादी साधित विशेषणे सिद्ध होतात तीही अकारान्तच असतात. त्यांची स्त्रीलिंगी रूपे आकारान्त वा ईकारान्त होतात. मग ती आपापल्या अन्त्यस्वरानुसार त्या त्या स्वरांत नामाप्रमाणे चालतात.
३