________________
१९८
अर्धमागधी व्याकरण
अंजलि वगैरे शब्द : अंजलि, पिट्ठी (पृष्ठ), अच्छि, पण्ह, चोरिया (चौर्य),
कुच्छि, बलि, निहि, विहि, रस्सि, गंठि २) संस्कृतमधील इमन्नन्त शब्दही विकल्पाने स्त्रीलिंगात योजले जातात.
गरिमा, महिमा, निल्लज्जिमा, धुत्तिमा ३) इतर काही शब्द स्त्रीलिंगात वापरलेले आढळतात.
अद्धा (अध्वना), सेंभा (श्लेष्मन्) , उम्हा (उष्मन्), गिम्हा (ग्रीष्म), हेमंता (हेमन्त)२
ई) तीन लिंगी शब्द :
एग हे संख्यावाचक, गुणविशेषणे, धातुसाधित विशेषणे, अम्ह व तुम्ह सोडून इतर सर्वनामे हे शब्द त्रिलिंगी आहेत. म्हणजे या शब्दांना विशेष्याच्या लिंगाप्रमाणे पुल्लिंग, स्त्री. वा नपुं. होते. अलिंगी शब्द : अम्ह व तुम्ह ही सर्वनामे, दो. ति. चउ, पंच' ही संख्याविशेषणे हे शब्द अलिंगी आहेत. म्हणजे या शब्दांची तीनही लिंगी रूपे समानच होतात.
१ हेम १.३५ २ घाटगे, पृ. ११४ ३ वा. वें. आपटे, पृ. ४० ४ वा. वें आपटे, पृ. ४० ५ व पंचप्रमाणे चालणारी इतर संख्याविशेषणे