________________
प्रकरण १० : नामरूपविचार
१९१
मरुत् = मरुय, यकृत् = यगय सरित् = सरिया ३) महत् चे महंत होऊन तो अकारान्त नामाप्रमाणे? चालतो.
महत् ची संस्कृतवरून वर्णान्तराने आलेली रूपे अशी : १) प्र. व. द्वि. ए. व. : महं २) तृ. ए. व. : महया
३) ष. ए. व. : महओ ४) दकारान्त शब्द : अ) अन्त्य द् चा लोप : परिषद् = परिसा, सुहृद् = सुहि आ) अन्त्य द् मध्ये स्वर मिळवून२ :
१) शरद् = सरय, हृद् = हिय २) सम्पद् = संपया, प्रतिपद् = पाडिवया, आपद् = आवया आपद् = आवइ, विपद् = विवइ धकारान्त शब्द : स्त्रीलिंगी 'क्षुध्' शद्वांत 'आ' मिळून तो 'छुहा, खुहा असा आकारान्त होतो.
नकारान्त शब्द : अ) अन्नन्त शब्द : राजन् व आत्मन् हे शब्द सोडून इतर अन्नन्त शब्द प्रायः
१) अन्त्य न् चा लोप होऊन अकारान्त होतात. वा २) काही शब्दात अन्त्य न चा लोप होऊन व त्यांना ‘आण' जोडून ते अकारान्त केलेल आढळतात. अन्त्य न् चा लोप : नामन् = नाम, कर्मन् = कम्म, प्रेमन् = पेम्म, जन्मन्
= जम्म, चर्मन् = चम्म, दामन् = दाम, पर्वन् = पव्व, स्थामन् = थाम २) अन्त्य न् चा लोप, मग ‘आण' मूर्धन् = मुद्धाण, युवन् = जुवाण (अ.
जवान), श्वन् = साण, अध्वन् = अद्धाण क्वचित् अन्त्य न मध्येच अ मिळविला जातो. जन्मन् = जम्मण या शब्दांची आपापल्या लिंगानुसार अकारान्त शब्दाप्रमाणे रूपे होतात.
अशी काही रूपे समजुतीसाठी पुढे दिली आहेत. १ उदा. नपुं. प्र. व. द्वि अ. व. महंताई. २ काही शब्दात विकल्प : मूर्धन् = मुद्ध, मुद्धाण इ.