________________
१८०
अर्धमागधी व्याकरण
अग्गि (अग्नि), इसि (ऋषि), निहि (निधि), पक्खि, हत्थि इत्यादि ह्रस्व इकारान्त पुल्लिंगी शब्द ‘मुणि' प्रमाणे चालतात.
१६१ अधिक रूपे अ) (१) प्र. अ. व. त अग्गओ (अग्गि), रिसओ (रिसि), महरिसओ
(महरिसि), भवदत्तादओ (भवदत्तादि), नायओ (ज्ञाति) अशीही रूपे आढळतात. द्वि. अ. व. मध्ये सुद्धा नायओ (ज्ञाति), अग्गओ (अग्गि) इत्यादि रूपे
आढळतात. ३) पं. ए. व. त प्रत्ययातील ओ चा कधी कधी उ होतो. उदा. अग्गीउ आ) इतर काही शब्दांची अधिकरूपे :
तृ. ए. व त अट्ठि (अस्थि) व मुट्ठि (मुष्टि) या शब्दांची अट्ठीण, मुट्ठीण अशीही रूपे आढळतात.
१६२ ह्रस्व इकारान्त नपुंसकलिंगी ‘दहि' शब्द विभक्ती ए. व. अ. व.
दहिं दहीइं, दहीणी
दहिं दहीइं, दहीणी सं.
दहिं दहीइं, दहीणी टीप : तृतीया ते सप्तमी पर्यंतची सर्व रूपे 'मुणि' प्रमाणे होतात.
अच्छि, वारि, सप्पि, इत्यादि ह्रस्व इकारान्त नपुं. शब्द ‘दहि' प्रमाणे चालतात.
१६३ ह्रस्व उकारान्त पुल्लिंगी ‘साहु' शब्द १ क्वचित् अन्त्य उ चा अव होऊन साहु शब्द अकारान्त केलेला आढळतो.
मग तो 'देव' प्रमाणे चालतो. उदा. साहवं (द्वि) साहवेण-णं (तृ.ए.व.) साहवेहि (तृ.अ.व.) साहवे (द्वि. अ. व.), साहव (सं.एव.) (पउमचरिय पहा)