________________
प्रकरण ९ : संधिविचार
१७१
= निस्संदेह, निर्दिष्ट = निद्दिट्ट, निष्प्राण = निप्पाण, निर्मल =निम्मल, निष्पङ्क = निप्पंक ७) दुर् : दुश्चरित = दुच्चरिय , दुर्लभ = दुल्लह, दुर्वर्ण = दुव्वण्ण, दुःसह = दुस्सह, दुर्जन = दुजण, दुर्गम = दुग्गम, दुर्वचन = दुव्वयण, दुर्धर = दुद्धर, दुर्बल = दुब्बल, दुष्प्रवेश = दुप्पवेस, दुर्निवारता = दुन्निवारया ८) षट् : षट्च = छच्च, षड्जीव = छज्जीव, षड्दर्शन = छदसण, षण्मुख = छम्मुह ९) चतुर् : चतुर्विध = चउव्विह, चतुर्याम = चाउज्जाम, चतुष्प्रकारम् = चउप्पयार १०) विद्युत् : विद्युत्प्रहार = विज्जुप्पहार ११) उद् : उल्लपति = उल्लवइ, उल्लाप = उल्लाव
१५१ आ) दोन स्वर जवळ आले असता कधी कधी एखादे अजिबात
नवे व्यंजन मध्ये येते (व त्या स्वरांचा परस्परसंधि टाळला जातो.)
या नवीन आलेल्या व्यंजनात पुढील स्वर मिसळतो. या नवीन येणाऱ्या व्यंजनाला ‘संधि-व्यंजन' म्हटले आहे.१ मध्ये येणारे हे व्यंजन प्रायः म्, कधी य् तर कधी र असते. १) २म् : एग + एग = एगमेग, अंग + अंग =अंगमंग, एक्क + एक्क = एक्कमेक्क,
अन्न + अन्न = अन्नमन्न, गोण + आइ = गोणमाइ, आहार + आईणि = आहारमाईणि, हय + आई = हयआई, सीह + आइणो = सीहमाइणो, आरिय + अणारिय = आरियमणारिय, दीह + अद्धा = दीहमद्धा, जोव्वण + उदए = जोव्वणमुदए, हठ्ठतुट्ठचित्त + आणंदिय = हट्टतुट्ठचित्तमाणंदिय, आचार + अट्ठा = आयारमट्ठा, कारण + उप्पन्ने = कारणमुप्पन्ने, एस + अट्टे = एसमढे, एस + अग्गी = एसमग्गी,
वत्थगंध + अलंकार = वत्थगंधमलंकार १. व्यंजनागम संधि (अ) व (आ) मधील फरक पुढीलप्रमाणे आहे : (अ)
मध्ये मूळ संस्कृतशब्दातील व्यंजनाचे पुनरागमन होते (आ) मध्ये मुळात नसलेले एखादे व्यंजन मध्ये येऊन जवळ आलेल्या दोन स्वरांचा संधि
टाळला जातो. २. त्याच स्वरादि शब्दाची द्विरूक्ति असता, पुढील शब्द आइ (आदि) असता
व इतर काही ठिकाणी 'म्' आलेले आढळते.