________________
१६८
अर्धमागधी व्याकरण
२) विंशत्-वीस, सिंह = सीह, त्रिंशत् = तीसा, सिंहासन = सीहासण
१४८ ह्रस्व स्वरापुढे असणाऱ्या संयुक्त व्यंजनाचे सुलभीकरण झाल्यास
तो ह्रस्व स्वर दीर्घ होतो (सुलभीकरण पहा) दक्षिण = दाहिण, अश्व = आस, शिष्य = सीस, मिश्र = मीस, उत्सव =ऊसव, मनुष्य = मणूस
१४९ संस्कृतमधून वर्णान्तराने आलेले संधि
संस्कृतमध्ये संधि होऊन एकत्र आलेले शब्द अर्धमागधीत कधी कधी वर्णान्तराने येतात. असे काही संधि पुढीलप्रमाणे : अ) ह्रस्व इकारान्त व उकारान्त उपसर्गांचे पुढील स्वराशी झालेले संधि अर्धमागधीत
वर्णान्तराने आलेले आढळतात२. १) अति चे संधि : अत्यन्त =अच्वंत, अत्यद्भुत = अच्चब्भुय, अत्यासन्न =
अच्चासन्न, अत्युद्विग्न = अच्चुव्विग्ग, अत्युग्रता =
अच्चुग्गया २) अधि चे संधि : अध्युपपन्न = अज्झोववन्न, अध्यवसान = अज्झवसाण ३) प्रति चे संधि : प्रत्याख्यात = पच्चक्खाय, प्रत्यागत = पच्चागय, प्रत्यक्ष १ मागील स्वर दीर्घ असल्यास तो तसाच राहतो. : पार्श्व = पास, दीर्घ =
दीह, मूत्र = मूय. २ अशा संधीने येणाऱ्या त्य व र्य यांचे बाबतीत कधी कधी स्वरभक्तीचा
अवलंब केला जातो. तर कधी संयुक्तव्यंजनातील एका व्यंजनाचा लोप केला जातो. १) लोप : प्रत्युत्पन्न = पड़प्पन्न, प्रत्युपचार = पडोयार, प्रत्युपचारयन्ति = पडोयारेंति २) स्वरभक्ति : अत्यादर = अइयायर, नात्युष्ण = नाइउण्ह, अध्यासयन्ते = अहियासिज्जंति, प्रत्यागत = पडियागय, प्रत्येक = पाडिएक्क, अत्युत्कण्ठित = अइउक्कंठिय, प्रत्युपकार = पडिउवयार, अत्याकुल = अइआउल, अत्युत्कर्ष = अइउक्कस संस्कृतमधून आलेले असे मराठीतील संधि : अत्यंत, अध्यवसान, प्रत्यक्ष, अभ्युत्थान, अनन्वित इ.